AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिवंडी कोहिनूर इमारत दुर्घटना प्रकरणी महत्त्वाची अपडेट; 10 जणांच्या मृत्यूनंतर पोलिसांची मोठी कारवाई

bhiwandi building collapse : भिवंडीत इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी इमारत मालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी कोहिनूर इमारत दुर्घटना प्रकरणी महत्त्वाची अपडेट; 10 जणांच्या मृत्यूनंतर पोलिसांची मोठी कारवाई
| Edited By: | Updated on: Aug 01, 2026 | 9:04 AM
Share

भिवंडी कोहिनर इमारत दुर्घटना प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. भिवंडी शहरातील गंगारारामवाडी भागातील कोहिनूर इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन जण जखमी आहेत. या प्रकरणी निझामपूर महानगरपालिकेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर इमारत मालक आणि दुरुस्ती कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पढील कारवाईला सुरुवात केली आहे.

इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीचा मालक बिलाल अहमद अबुबकर खान यांच्यावर आवश्यक परवानग्या न घेता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर या इमारतीचे खांब दुरुस्त करणारे कंत्राटदार अशोक यांच्यावरही आरोप करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांनी दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १०५, १२५(अ)(ब) आणि एमआरटीपी कायद्याच्या कलम ५२ आणि ५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

इमारत दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू 

भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त (अनधिकृत बांधकाम विभाग) फैजल अब्दुल कय्यूम तातली यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. तर गुरुवारी रात्री 11 वाजता घडलेल्या दुर्घटनेत क्रिस कुमार (४१), रणजीत सिंग (३२), मिराज रसूल शेख (३४), शमिम अन्सारी (३०), राकेश पासवान (३०), अशोक पासवान (४२), मुकेश पासवान, संतोष कुमार पांडे (४२),(३५), श्यामजी मुरहू पाल (४८) आणि राधेश्याम कमलेश कुशवाहा (४६) यांचा मृत्यू झाला.

दुर्घटनेत तिघे जखमी 

अभय कुमार यादव (२४), दीपक कुमार यादव (२५) आणि संगीता प्रजापती (३६) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आता धोकादायक इमारती, अनधिकृत बांधकाम आणि महानगरपालिकेने त्यावर केलेल्या कारवाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी शांती नगर पोलीस पुढील तपास करत आहेत. तत्पूर्वी, भिवंडीतील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील धोकादायक इमारती सक्तीने रिकाम्या करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच अतिधोकादायक इमारतीतबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिकांना आदेश दिले आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा