Pune | सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे विद्यापीठात भुजबळांच्या हस्ते भूमिपूजन

| Updated on: Nov 28, 2021 | 5:27 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे.

Pune | सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे विद्यापीठात भुजबळांच्या हस्ते भूमिपूजन
पुण्याच्या विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. पुतळ्याच्या या जागेचे भूमिपूजन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Follow us on

पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. सावित्रीबाईंच्या येणाऱ्या जयंतीदिनी, 3 जानेवारी रोजी या पुतळ्याचे अनावरण होईल, अशा पद्धतीने सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे. आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके,आमदार सिद्धार्थ कुशवाह, पंकज भुजबळ, कमलताई ढोले-पाटील, बापूसाहेब भुजबळ, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, प्राचार्य संजय चाकणे, प्राचार्य सुधाकर जाधवर आदी उपस्थित होते.

मुलींची शाळाही उभारणार

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाची ओळख मुख्य इमारत आहे. या इमारतीसमोर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. भुजबळ यांनी पुतळा उभारणीबाबत विद्यापीठातील प्रत्यक्ष जागेची यापूर्वी पाहणीही केली होती. राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून या कामास तात्काळ प्रारंभ करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले आहेत. त्यानुसार मुलींची पहिली शाळा असलेला भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्यावतीने सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा उभारण्यात येणार आहे.

बघेल यांचा गौरव

पुण्यात आज छत्तीगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा महात्मा फुले समता पुरस्काराने गौरव करण्यात आला. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. यावेळी बघेल म्हणाले की, महात्मा फुले यांनी वयाची 63 वर्षे समाज क्रांतीचा लढा दिला. त्यांनी लावलेली ज्योत आजही तेवत आहे. उत्कट क्रांतीकारी जीवन महात्मा फुले यांचे होते. कुठल्याही समस्येपासून त्यांनी माघार न घेता समाजातील वंचित, पीडित घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. अंधविश्वासावर प्रहार करून ती नष्ट करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. देशात साडेतीन हजार वर्षे पीडित समाजाने काम केलं. त्यामुळे जगाच्या आर्थिक उत्पन्नात भारताचा 23 टक्के वाटा होता. त्यामुळे भारताला सोने की चिडीया असे संबोधले जात होते. ब्रिटीश आल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यावेळी समतेची ज्योत महात्मा फुले लावली. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढले त्यांना न्याय मिळवून दिला. त्याच महात्मा फुले यांच्या विचारांवर छत्तीसगढ राज्य कार्य करत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्याः

महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे झाली, पण अनेकांना डायजेस्ट होत नाही; भुजबळांचा विरोधकांना टोला, मुख्यमंत्री बघेलांचा समता पुरस्काराने गौरव

अमोल इघे खून प्रकरणी नाशिक पोलिसांवर राजकीय दबाव, दरेकरांचा आरोप; विधिमंडळात आवाज उठवणार