पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, इंडुकेअर फार्मास्युटिकल कंपनीचा परवाना रद्द, धक्कादायक माहिती समोर
तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सुत्रं आपल्या हाती घेतल्यापासून एफडीएकडून कारवाईचा धडका सुरूच आहे. आता एफडीएकडून पुण्यातील 'इंडुकेअर फार्मास्युटिकल' कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सुत्रं आपल्या हाती घेतल्यापासून एफडीएकडून कारवाईचा धडका सुरूच आहे. आतापर्यंत अनेक अस्थापनांवर तुकाराम मुंढे यांनी कारवाई केली आहे. आता सध्या तुकाराम मुंढे यांच्या रडारवर औषध उत्पादन कंपन्या असल्याचं दिसून येत आहे. पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीवर एफडीएकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंडुकेअरची 9 औषधं अप्रमाणित आणि बनावट असल्याचं समोर आलं आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता एफडीएकडून कंपनीचा औषध उत्पादन परवाना रद्द करण्यात आला आहे.
पुण्यातील ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचा औषध उत्पादन परवाना पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे. परवानगीशिवाय 9 औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. इंडुकेअरची सर्व 9 औषधं अप्रमाणित आणि बनावट असल्याचं उघड झालं आहे. पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयातून इंडुकेअरचा 1.72 कोटींचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान यापूर्वी सप्टेंबर 2026 मध्ये देखील 25 गंभीर त्रुटींमुळे ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला होता. आता ही दुसरी वेळ आहे. आता दुसऱ्यांदा ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीचा औषध उत्पादन परवाना पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे. परवानगीशिवाय 9 औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. इंडुकेअरची सर्व 9 औषधं अप्रमाणित आणि बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान तुकाराम मुंढे यांची एफडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर कारवायांना वेग आल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीला अनेक हॉटेल्स व अन्न पदार्थ जिथे तयार होतात, अशा दुकांनांवर एफडीएकडून छापे टाकण्यात आले. त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा हा औषध कंपन्यांकडे वळवल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रोटीन पावडरवरून इशारा दिला होता. त्यानंतर आता पुण्यात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. बनावट औषधांसदर्भात माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.