AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून अजितदादांना जबर दणका, बड्या महिला नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Ajit Pawar NCP : कोल्हापूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. एका बड्या महिला नेत्याने राष्ट्रवादीची साथ सोडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून अजितदादांना जबर दणका, बड्या महिला नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
Ajit pawar ncp sadImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jan 21, 2026 | 9:40 PM
Share

राज्यात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महानगर पालिकांच्या निवडणुका अलिकडेच पार पडल्या आहे, त्यानंतर आता जिल्हा 12 परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केल्याचे समोर आले आहे. अशातच आता कोल्हापूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. एका बड्या महिला नेत्याने राष्ट्रवादीची साथ सोडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शीतल फराकटे यांचा शिवसेनेत प्रवेश

जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापूरमधील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या शीतल फराकटे यांना अजित पवारांची साथ सोडली आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने शीतल फराकटे यांनी पक्षाची साथ सोडली. यानंतर शीतल फराकटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का मानला जात आहे.

ज्या पक्षासाठी दिवस रात्र एक केला त्याच पक्षाने माझी उमेदवारी नाकारली – शीतल फराकटे

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बोलताना शीतल फराकटे यांनी म्हटले की, ‘ज्या पक्षासाठी आणि ज्या नेत्यांसाठी मी अनेक वर्ष दिवस रात्र एक केला त्याच पक्षाने माझी उमेदवारी नाकारली. गेली तीन वर्ष हसन मुश्रीफ हे मला जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लाग असे सांगत होते मात्र असं काय झालं की त्यांनी माझी उमेदवारी नाकारली. माझा स्वाभिमान दुखावलेला आहे मी माघार घेतली असती तर मी तारा राणीची लेक कसली.’

माझी शैली तशीच राहणार – शीतल फराकटे

पुढे बोलताना शीतल यांनी म्हटले की, ‘मी केवळ उमेदवारी मिळाली म्हणून राष्ट्रवादी सोडलेली नाही तर माझ्या स्वाभिमानासाठी मी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. मला आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील फोनवरून नेमकं काय झालं याचं कारण विचारलं. त्यांनी सुद्धा माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आश्चर्य व्यक्त केलं. रूपाली चाकणकर, सुनील तटकरे यांनी देखील माझ्याशी संपर्क करून विनंती केली. मी राष्ट्रवादी पक्षात असताना जी माझी शैली होती, जो माझा बाणा होता तोच शिवसेनेतही राहणार आहे असं शीतल यांनी म्हटलं आहे.’

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान