सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रीय अध्यक्षपद अडचणीत? घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? उपस्थित करण्यात आलं आहे.

सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रीय अध्यक्षपद अडचणीत? घडामोडींना वेग
sunetra pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 13, 2026 | 6:01 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? उपस्थित करण्यात आलं आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 9 जुलै रोजी सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक ही अवैध असल्याचा दावा देखील सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?  

पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक ही अवैध असल्याचा दावा देखील  त्यांनी केला आहे, त्यामुळे ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि  पक्षाचे सचिव म्हणून ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत स्वतंत्र आणि निपक्षपाती असा निवडणूक अधिकारी नेमून त्यांच्या मार्फत निवडणूक घेण्यात यावी. तोपर्यंत  राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारीत ॲाफिस बेअररची यादी ही रद्द समजावी, असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, अजितदादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सुत्रं आपल्या हातात घेतली, त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देखील घेतली, तसेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती. परंतु आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता या नोटीसवर सुनेत्रा पवार या काय प्रतिक्रिया देणार? ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Follow Us