
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीसंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये कोणाला किती जागा मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तर मराठी आणसानं आमच्या पाठिशी उभं राहावं असं भावनिक आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं युतीची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे युतीची घोषणा होऊन काही तास उलटत नाहीत तोच मनसेला मोठा धक्का बसला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. सुमित खांबेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणूक आहे, प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे, मात्र त्यातच आता मनसेला या निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधून अनेकांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. यामधून आता मनसे देखील सुटू शकलेली नाहीये. शिवसेना शिंदे गटानं मनसेला धक्का दिला आहे. पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचं मोठं आवाहन आता शिवसेना ठाकरे गटासममोर असणार आहे. तर मनसेमध्ये देखील अनेक नेते नाराज आहे, आता पक्ष या नाराज नेत्यांची समजूत कशी घालणार? नाराजी कशी दूर होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसीकडे तब्बल 18 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंदू एकत्र आल्यानं राज्यात आनंद आणि उत्साहाच वातावरण आहे.