मोठी बातमी! अजितदादांचा शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश, तारीखही ठरली

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे, बडा नेता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे.

मोठी बातमी! अजितदादांचा शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश, तारीखही ठरली
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 01, 2025 | 4:32 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, ही चर्चा सुरू असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नेता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. येत्या आठ तारखेल ते अजित पवार यांच्या उपस्थितीत पाथरीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. पाथरीमध्ये आज बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठीकमध्ये त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आणखी एक नेता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. बाबाजानी दुर्राणी हे येत्या आठ तारखेला राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान दोन्ही पवार कधी एकत्र येणार असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता, या प्रश्नाना उत्तर देताना शरद पवार यांनी ते मला माहिती नाही, असं म्हटलं होतं. तर यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं की, या फक्त चर्चा आहेत. त्याबाबत वरिष्ठांकडून आम्हाला काहीही सांगण्यात आलेलं नाही, त्यामुळे या फक्त चर्चा आहेत. जर आम्हाला काही कळालं तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.