मोठी बातमी! अभिजीत दिपकेंच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ, थेट..,

मोठी बातमी समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने उद्या पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मोठी बातमी! अभिजीत दिपकेंच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ, थेट..,
CJP Press Conference
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 4:13 PM

मोठी बातमी समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य असलेल्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी अटक केलं आहे. त्यांच्या अटकेच्या विरोधात दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सीजेपीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला नेहा बोरा, अभिजीत दिपके यांची देखील उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पत्रकार परिषद बंद करा, बंद करा अशी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.  दरम्यान त्यानंतर या गोंधळावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 50, 100 रुपयांसाठी गोंधळ घालणारे हे लोकं आहेत, असं अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत पुन्हा आंदोलन 

Loading...

दरम्यान दिल्लीमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. सीजेपीचे सदस्य असलेल्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता सर्वांनी कॅनॉट प्लेस परिसरात एकत्र यावं असं आवाहन बुधवारीच अभिजीत दिपके यांनी केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद पार पडली, मात्र या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने गोंधळ घातल्याची माहिती समोर येत आहे.

आशुतोष रांका, सौरभ दास पोलिसांच्या ताब्यात 

दरम्यान जंतर मंतरवर आता आंदोलनासाठी कायम स्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. तसेच या परिसरात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. मात्र असं असताना देखील सीजेपीचे सदस्य असलेले आशुतोष रांका आणि सौरभ दास हे आपल्या काही मित्रांसह तिथे पोहोचले होते, त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सीजेपीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us