मोठी बातमी! महायुतीमध्ये मोठा ड्रामा; एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं, दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये
राज्यात सध्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गुरुवारी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र काही जागांवर बंडखोर अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत मोठा ड्रामा पहायला मिळत आहे. नाशिक विधान परिषदेसाठी सुरुवातीला भाजपकडून गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यानंतर महायुतीच्या बैठकीमध्ये नाशिकची जागा शिवसेनेला देण्यात आली. महायुतीची जागा शिवसेनेला मिळाल्यानंतर नरेंद्र दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान दुसरीकडे गणेश गीतेंचे बंधू गोकूळ गीते यांनी देखील नाशिक विधान परिषदेसाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन्ही गीते बंधूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मात्र गीते बंधूंचा कोणत्याही शिवसेनेच्या नेत्यांशी सर्पक झाला नसल्याचं आता समोर आलं आहे.
नाशिक विधान परिषदेसाठी सुरुवातीला भाजपच्या गणेश गीतेंकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या महायुतीच्या बैठकीत नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंनी त्यांचा अधिकृत अर्ज दाखल केला. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही बंडखोरी करत विष्णुपंत म्हैसधुने, गोरख बोडके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणी गोकुळे गीते यांनी देखील आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी गणेश गीते आणि गोकुळ गीते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र गीते बंधू शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुसरीकडे गोरख बोडके यांनी मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांची भेट घेऊन निवडणुकीतून माघार घेण्याबाबत चर्चा केली. या भेटीनंतर बंडखोर लवकरच माघार घेतील अशी अशा उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेले नाहीये. त्यामुळे आता त्यांचे नगरसेवक कोणाला मतदान करणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.