ठरलं! बडा नेता 500 कार्यकर्त्यांसह करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, महापालिकेपूर्वी होणार मोठा गेम

सध्या शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, आता आणखी एक मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

ठरलं! बडा नेता 500 कार्यकर्त्यांसह करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, महापालिकेपूर्वी होणार मोठा गेम
| Updated on: Aug 11, 2025 | 3:22 PM

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. त्यापूर्वी पक्षांतरणाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीनंतर घटक पक्षांना लागलेली गळती महाविकास आघाडीसाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटातील अनेक मोठ्या नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. दरम्यान आता आणखी एक बडा नेता शिवसेना शिंदे गटात लवकरच प्रवेश करण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. शिरीष चौधरी हे अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते, ते आता लवकरच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, याबाबत शिरीष चौधरी यांनी स्वत: बोलताना माहिती दिली.

भाजप तसेच इतर पक्षाचे आजी – माजी नगरसेवक तसेच सरपंच अशा जवळपास 400 ते 500 कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी फोनवरून संवाद साधताना दिली आहे, दरम्यान शिरीष चौधरी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यास स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार आहे, त्यामुळे विरोधकांचा मोठा गेम होऊ शकतो.

शिरीष चौधरी यांनी यावेळी सुद्धा अमळनेर मतदार संघातून विधानसभेची अपक्ष निवडणूक लढविली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरीष चौधरी यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश हा महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान दुसरीकडे जळगावात आज काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.