AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर्षल पाटील प्रकरणात मोठी बातमी, धक्कादायक माहिती समोर

सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावातील रहिवाशी असलेले हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घडना घडली आहे, या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

हर्षल पाटील प्रकरणात मोठी बातमी, धक्कादायक माहिती समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 24, 2025 | 4:09 PM
Share

सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावातील रहिवाशी असलेले  हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घडना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांचे जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे तब्बल एक कोटी चाळीस लाख रुपये थकले होते, शासनाकडून वेळेत पैसे मिळत नसल्यानं त्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र आता या प्रकरणात वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.

हर्षल पाटील प्रकरणावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील व  सांगली जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी हर्षल पाटील हे आमच्याकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाहीत, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. मात्र तांदूळवाडी या गावातील जलजीवन मिशनचं काम पूर्ण केलेल्या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या फलकावर स्पष्टपणे ठेकेदार म्हणून हर्षल अशोक पाटील व अक्षय अशोक पाटील यांची नावं नमूद आहेत. या प्रोजेक्टचे उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील, मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे सर्व मान्यवर या प्रोजेक्टचे आणि हर्षल पाटील ठेकेदार असल्याचे साक्षीदारी असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान या प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मोठा दावा केला आहे. हे कंत्राट दुसऱ्याच कंत्राटदाराला देण्यात आलं होतं, त्यांनी सब कंत्राटदार नेमला होता. आमचा संबंध येते तो मुख्य कॉन्ट्रॅक्टरशी, उद्या तुम्ही कंत्राटदार म्हणून काम घेतलं आणि आम्ही तुम्हाला काम दिलं. तुमचे बिल येतील तसे आम्ही पैसे देऊ, समजा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सब कंत्राटदार नेमलं असेल, तर सब कंत्राटदाराला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये, अधिकार तुमचा आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे, समोर आलेल्या माहितीनुसार जलजीवन मिशनंतर्गत केलेल्या कामाचे पैसे थकले होते, पैसे वेळेत मिळत नसल्यानं त्यांनी टोकाचं पाऊल उचल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच