नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी बातमी; मनिषा हवालदारबाबत धक्कादायक माहिती समोर

नीट पेपर फुटी प्रकरणात मनिषा हवालदारला सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. दरम्यान आता तिच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी बातमी; मनिषा हवालदारबाबत धक्कादायक माहिती समोर
| Updated on: May 23, 2026 | 9:36 PM

वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असणारी नीट परीक्षा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या परीक्षेचे पेपर लीक झाल्यानंतर सरकारने अखेर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी मनिषा हवालदारला ताब्यात घेतलं होतं. मनिषा हवालदारच्या चौकशीमधून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे . नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे फिजिक्सच्या प्रश्न संचाचे नोट्स मनिषा हवालदारने जाळले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नोटस् जाळून पुरावा नष्ट केल्याची माहिती सीबीआय तपासातून समोर आली आहे.

तपास यंत्रणांना संशय येऊ नये, यासाठी आरोपी मनिषा हवालदराने नोट्स जाळल्या अशी माहिती समोर येत आहे. मनिषा मांढरेसोबतचे चॅट देखील मनिषा हवालदारने डिलिट केल्याची माहिती समोर येत आहे. मनिषा हवालदारला शुक्रवारी अटक करण्यात आलं, त्यानंतर तिची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली, या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यामध्ये एक धक्कादायक खुलासा असा समोर आला आहे, तो म्हणजे तिने फिजिक्स विषयाचे जे प्रश्नसंच बनवले होते, त्या प्रश्न संचाच्या काही महत्त्वाच्या नोट्स तिने विद्यार्थ्यांना देण्यासाठी काढल्या होत्या, विद्यार्थ्यांना त्या नोट्स दिल्यानंतर तिने त्या नोट्स जाळून टाकल्या आहेत.

Loading...

आपल्या विरोधात कुठलाही पुरावा सापडू नये, यासाठी तिने त्या सर्व नोट्स जाळून टाकल्याची माहिती सीबीआय तपासातून समोर आली आहे. सोबतच तिने या प्रश्नसंचाच्या नोट्सचे व्हॉट्सअप फोटो काढून ज्यांना -ज्यांना पाठवले होते, ते सर्व फोटो देखील तिने डिलीट केले आहेत. अशा पद्धतीची धक्कादायक माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे. आपल्याविरोधात कुठलाही पुरावा राहू नये याची पूर्ण खबरदारी मनिषा हवालदाने घेतली होती. मात्र सीबीआयने तिला ताब्यात घेतल्यानंतर आता या गोष्टी समोर आल्या आहेत. सीबीआयकडून मनिषा हवालदार हिचा मोबाईल देखील ताब्यात घेण्यात आला असून, डाटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. त्यातून आता काही आणखी गोष्टी समोर येतात का? हे पहाणं महत्त्वाचं असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us