मोठी बातमी! राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी, बारामतीची निवडणूक तीन दिवसांवर आली असतानाच 35 जणांचे तडाकाफडकी राजीनामे
बारामती विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. 35 जणांनी राजीनामे दिले आहेत.

अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, अजित पवार यांच्या अपघातानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. दरम्यान त्यानंतर आता या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडून या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसकडून देखील या मतदारसंघात आपला उमेदवार देण्यात आला होता. काँग्रेसने या मतदारसंघात आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती.
मात्र महायुतीच्या प्रयत्नांना यश आलं उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान यामुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला, तरी देखील ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये, अनेक अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. दरम्यान या निवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असातना राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.
सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून गट नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावरून वातावरण चांगलंच तापलं असून, शहर राष्ट्रवादीच्या 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सोपवले आहेत. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत गटनेते मैनूद्दीन बागवानांकडून पक्षाचा आदेश डावला गेल्याचा आरोप या नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांनंतर सांगली राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं असून, तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. दुसरीकडे शहर जिल्हाध्यक्ष पदमाकर जगदाळे यांनी देखील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी देखील गटनेते बागवान यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.