मोठी बातमी! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला मोठा दिलासा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कृषीमंत्री चौहान ॲक्शन मोडमध्ये
दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरड्या दुष्काळाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता राज्यातील दुष्काळाची दखल केंद्र सरकारने देखील घेतली असून, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, पावसाभावी पिकं वाळून गेले आहेत. राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरड्या दुष्काळाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता राज्यातील दुष्काळाची दखल केंद्र सरकारने देखील घेतली असून, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीची केंद्र शासनाने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय पथकाकडून आता महाराष्ट्रातील दुष्काळाची पहाणी करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
3 ऑक्टोबर नंतर केंद्रीय पथक महाराष्ट्रात दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील सुमारे दोन-तृतीयांश क्षेत्र दुष्काळाच्या विळख्यात असल्याचे नमूद करत, शिवराजसिंह चौहान यांनी केंद्र सरकार राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सुद्धा भरीव मदत करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर
महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस झालेला नाहीये. पावसाभावी पिकं जळून गेली आहेत. सोयाबीन, कापूस या सारख्या खरीप हंगामातील पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी हातबल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे खरीप नंतर आता रब्बी हंगामाची देखील चिंता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 265 तालुक्यांचा समावेश हा दुष्काळ क्षेत्रात करण्यात आला आहे. जवळपास राज्यातील 75 टक्के भागामध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे.
दरम्यान त्यानंतर आता केंद्र सरकारकडून देखील राज्यातील दुष्काळाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. 3 ऑक्टोबर नंतर केंद्रीय पथक महाराष्ट्रात दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील सुमारे दोन-तृतीयांश क्षेत्र दुष्काळाच्या विळख्यात असल्याचे नमूद करत, शिवराजसिंह चौहान यांनी केंद्र सरकार राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. शिवराजसिंह चौहान हे स्वत: महाराष्ट्राचा दौरा करून दुष्काळग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. केंद्र सरकारकडून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.