AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तुकाराम मुंडेंना हायकोर्टाचा मोठा दणका, आता एफडीएकडे फक्त दोनच पर्याय

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हाय कोर्टात करण्यात आला होता, मात्र तपासणीमध्ये या कँटीनमध्ये माश्या आढळून आल्या आहेत, त्यावर आता हाय कोर्टाने एफडीएला दोन पर्याय दिले आहेत.

मोठी बातमी! तुकाराम मुंडेंना हायकोर्टाचा मोठा दणका, आता एफडीएकडे फक्त दोनच पर्याय
Tukaram Mundhe Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 31, 2026 | 4:13 PM
Share

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हाय कोर्टात करण्यात आला होता, त्यावर मुंबई हाय कोर्टाकडून कँटीनची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. हाय कोर्टाच्या आदेशानुसार चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कँटनची तपासणी करण्यात आली, तपासणीदरम्यान कँटीनमध्ये माश्या आढळून आल्या आहेत. तसेच भाजी कापण्यासाठी वापरण्यात येत असलेले चाकू देखील अत्यंत जुने आणि गंजलेले  असल्याचे आढळून आलं आहे. हा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला आहे.  यावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.

सुनावणीदरम्यान हायकोर्टाने म्हटलं की, एक तर  मंत्रालयाच्या उपहारगृहाचे लायसन्स सस्पेंड करा किंवा केळ्यांवर फक्त काळे डाग आहेत म्हणून कारवाई केलेले लायसन्स रद्द केलेली ऑर्डर मागे घ्या. कायदा नियम हा सगळ्यांना समान असायला हवा, त्यात व्हीआयपी कल्चर असायला नको. व्हीआयपी लोकांसाठी तर कायदा अजिबात मोठा असायला नको. आम्ही एफडीएच्या अधिकाऱ्यांना आता वॉर्निंग देत आहोत यावर सविस्तर स्पष्टीकरण हवे आहे, असं यावेळी हायकोर्टाने म्हटलं आहे.

तपासणीसाठी गेलेल्या वकिलांनी काय सांगितलं? 

दरम्यान हायकोर्टाच्या आदेशानुसार चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून मंत्रालयाच्या कँटीनची तपासणी करण्यात आली,  हा अहवाल कोर्टात सादर करताना मंत्रालयातील लादी फुटलेली होती, फ्रिजमध्ये अस्वच्छता होती. पाण्याच्या नळांची नीट दुरुस्ती नव्हती, ते लिकेज आहेत, अशी माहिती तपासणीसाठी गेलेल्या वकिलाने कोर्टात दिली.

त्यावर बोलताना न्यायालयाने असं म्हटलं की, कायद्यात दुजाभाव असू शकत नाही, मंत्रालयात ड्रेनेज पाइपलाइन तुटलेली आहे, पाणी जायला जागा नाही आणि त्यातच तुम्ही भांडी घासता आहात.  यावेळी न्यायमूर्तींनी फ्रिजचे फोटो दाखवत एफडीएच्या अधिकाऱ्यांना चांगलच खडसावलं देखील आहे. फ्रिजचे फोटो दाखवत यापेक्षा चप्पलचा स्टँड स्वच्छ असतो, असंही कोर्टाने म्हटलं आहे. एखाद्या ठिकाणी काही अनियमितता आढळली तर नोटीस देऊन एकदा तरी बजावयाला हवं, सुधारणेसाठी संधी द्यायला हवी. आम्हीही लोकांना दुसरी संधी देतो. तुम्ही थेट परवाना रद्द करत असाल तर हे योग्य नाही. तुम्ही चांगले काम करत आहात आम्हाला मान्य आहे, कोणीतरी हे करायला हवं ,पण त्यात सर्वांना समान न्याय असायला हवा, असं यावेळी हायकोर्टाने म्हटलं आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा