AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ठाकरे गटाच्या बंडखोर खासदार प्रकरणात मोठा ट्विस्ट; अजूनही डाव उद्धव ठाकरेंच्याच हातात? गेम पलटणार

शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे, शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत, तसेच ते स्वतंत्र गट करण्याच्या तयारीमध्ये देखील असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

मोठी बातमी! ठाकरे गटाच्या बंडखोर खासदार प्रकरणात मोठा ट्विस्ट;  अजूनही डाव उद्धव ठाकरेंच्याच हातात? गेम पलटणार
उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 3:08 PM
Share

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी सहा खासदार फुटले आहेत.  हा शिवसेना ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या आठवड्यात रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांची बैठकी बोलावली होती, तेव्हाच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. कारण या  बैठकीला प्रत्यक्षात शिवसेना ठाकरे गटाचे केवळ चारच खासदार उपस्थित होते, तर 5 खासदार हे व्हिसीद्वारे उपस्थित होते, असा दावा, त्यावेळी संजय राऊत यांनी केला होता, तसेच सर्व खासदार हे आमच्यासोबतच असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

मात्र आता जवळपास चित्र स्पष्ट होताना दिसत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची माहिती समोर येत आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या सहा खासदारांकडून नवा गट स्थापन करण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील,  वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव हे सहा खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे तीन खासदार अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत.

मात्र आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याची बातमी आहे, ज्यामध्ये खासदार संजय देशमुख यांचा देखील समावेश आहे. मात्र त्यांनी आता मोठं विधान केलं आहे. संजय देशमुख यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. असं अजून काहीही घडलेलं नाहीये, आम्ही कोणाकडेही गेलेलो नाही, असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी केलं आहे.  तर दुसरीकडे असंच विधान संजय दिना पाटील यांनी देखील केलं आहे , दरम्यान यामुळे आता पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे,  या सर्व पार्श्वभूमीवर आता मातोश्रीवर देखील घडामोडींना वेग आला असून, या संदर्भात आता गुरुवारी सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Follow Us
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू