
महाराष्ट्राला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे, पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे, शेतकरी हातबल झाले आहेत, घरादारात पुराचं पाणी शिरल्यानं अनेकांचा सगळा संसारच वाहून गेला आहे. अनेकांचे घरं देखील पडले. या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेमध्ये अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पॅकेजी घोषणा करण्यात आली आहे. या पॅकेजमधून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत, सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500 रुपयांची मदत मिळणार आहे, तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. बागायती शेतीला 32500 रुपयांची मदत केली जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा
1)शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे.
2) कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500 रुपयांची मदत मिळणार आहे.
3) हंगामी बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27 हजार रुपयांची मदत.
4) तर बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 32500 रुपयांची मदत.
5) अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचं नुकसान झालं आहे, त्यांच्यासाठी तीस हजार रुपयांची विशेष मदत.
6) इन्फ्राक्ट्रक्चरसाठी दहा हजार कोटींची तरतूद.
7) पावसामुळे ज्यांची घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, पडली आहेत, अशा लोकांना पीएम आवास योजनेंतर्गत नवं घर, तसेच ज्यांच्या घराचं अंशत: नुकसान झालं आहे, त्यांना घर उभारणीसाठी मदत.
8) ज्या शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेली आहेत, पावसामुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे, त्यांना प्रति पशू 37 हजारांची मदत.
9) ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे, त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एकूण साडेतीन लाखांच्या मदतीचा निर्णय, त्यापैकी 47 हजार रुपये हे रोख मिळणार आहेत, तर बाकीचे मनरेगाच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे.
10) ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे, त्यांना नुकसानभरपाईची घोषणा.