
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून आता महापाैर पदावरून रस्सीखेच बघायला मिळत आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आणि महापालिका निवडणुका लढल्या. मनसेला घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचा नक्कीच फायदा झाला. मात्र, मनसेला फार जास्त फायदा न झाल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने काहीतरी वेगळे घडण्याचा अंदाज होता. मात्र, तरीही महापालिका निवडणुकीत भाजपानेच बाजी मारली. राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत गेल्यानंतर दावा केला होता की, मुंबई महापालिकेचा महापाैर आमचाच होईल. मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला असून महापाैर हा युतीचा होणार आहे. मुंबई महापालिकेसोबतच इतर काही महापालिकांच्या निवडणुका भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती म्हणून लढवल्या. दोन्ही पक्षांची कामगिरी चांगली राहिली.
महापालिका निवडणुकीमध्ये अजून एका पक्षाने मोठी मुसंडी मारली. एमआयआमने अनेक महापालिकांमध्ये धमाकेदार कामगिरी केली आणि राज्यातील महापालिकांवर आपल्या पक्षाचा बोलबाल केला. मात्र, विरोधकांकडून आरोप करण्यात आला की, एमआयएमला भाजपानेच पाठिंबा दिला आणि त्यांनी मोठे केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने खास कामगिरी केली. मुंबई महापालिकेत मोठे यश एमआयएमला मिळाले.
आता थेट अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये भाजप आणि एमआयएमने युती केली. होय तुम्ही अगदी खरे ऐकले. एमआयएम आणि भाजपाने युती केली आहे. समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली. या युतीमध्ये एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडी समितीचे सभापती पद देखील मिळाले. मात्र, या युतीची आता राज्यभर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
एमआयएमच्या 3 , अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत गेला. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमसोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण फुटले. एमआयएम आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या विचारधारा पूर्णपणे वेगळ्या आहेत. कधीही एमआयएम आणि भाजपा एकत्र येईल, असा साधा कोणी विचारलही केला नाही. मात्र, अमरावतीच्या अचलपूरमध्ये हे प्रत्यक्षात ठरले आहे.