शिवसेनेने नगरसेवक फोडले, पण भाजपच्या गोटात आनंद, पेढे वाटून सेलिब्रेशन

| Updated on: Feb 09, 2021 | 10:53 PM

भाजपच्या कार्यकर्त्यांनी वैभववाडी चौकात फटाके फोडले. तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला. | BJP Shivsena

शिवसेनेने नगरसेवक फोडले, पण भाजपच्या गोटात आनंद, पेढे वाटून सेलिब्रेशन
Follow us on

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नगरपंचायतीमधील भाजपच्या (BJP) सहा नगरसेवकांना शिवसेनेने गळाला लावले. या नगरसेवकांचा पक्षप्रवेश मंगळवारी संध्याकाळी मातोश्रीवर पार पडला. मात्र, यानंतर वैभववाडीत भाजपच्या नेत्यांनी आगपाखड करण्याऐवजी हे नगरसेवक पक्ष सोडून गेल्याचे सेलिब्रेशन केले. (BJP 6 corporator joins Shiv Sena in Mumbai)

भाजपच्या कार्यकर्त्यांनी वैभववाडी चौकात फटाके फोडले. तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला. संबंधित नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे आता वैभववाडी शहर स्वच्छ झाले. आमदार नितेश राणे यांनी चिखल-माती तुडवत त्या गद्दारांना मागील निवडणुकीत निवडून आणले. मात्र, तरीही हे नगरसेवक शिवसेनेत गेले, अशी प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत पैकी 17 जागा जिंकणार

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत आम्ही 17 पैकी 17 जागा जिंकणार आणि गद्दारांना धडा शिकवणार, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला. वैभववाडीतील मुख्य चौकात जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांचा निषेध करण्यात आला.

‘कितीही वल्गना केल्या तरी शिवसेना संपणार नाही’

या सहा नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेला इशारा दिला. कोणी किती वल्गना केल्या तरी शिवसेना संपणार नाही, असे त्यांनी म्हटले.

भाजप हा देशातील मोठा पक्ष आहे. हा एका कुणाचा पक्ष नाही. तो संघटनेचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असं त्यांच्या एका नेत्याने वक्तव्य केलं होतं. पण निवडणुकीनंतरच कोण जिंकेल ते दिसेल. आज पक्षप्रवेश झालेला आहे. नगरपालिकेत 14 कोटींचं काम शिवसेना करुन दाखवेल. ते काम झाल्यानंतर वैभववाडीची नगरपंचायत शंभर टक्के शिवसेनेच्या ताब्यात येईल, असा दावा उदय सामंत यांनी केला.

संबंधित बातम्या :

‘नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश’, शिवसेनेची खोचक टीका

‘नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश’, शिवसेनेची खोचक टीका

(BJP 6 corporator joins Shiv Sena in Mumbai)