चंद्रकांत पाटील अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल; निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काय झाली चर्चा?

| Updated on: Nov 26, 2021 | 7:00 AM

राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांतदादांनी अमित शाह यांना माहिती दिली, असं भाजप कार्यालयाने सांगितलं.

चंद्रकांत पाटील अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल; निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काय झाली चर्चा?
अमित शाह, चंद्रकांत पाटील (फाईल फोटो)
Follow us on

नवी दिल्लीः भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांनी अमित शाह यांना भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांतदादांनी अमित शाह यांना माहिती दिली, असं भाजप कार्यालयाने सांगितलं आहे. मात्र, महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

असे सांगण्यात येत होते की, अमित शहा नोव्हेंबर अखेरीस पुण्यात येतील आणि पुणे महानगरपालिकेच्या काही नवीन प्रकल्पांचं उद्घाटनं करतील. महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आणि पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहांच्या हस्ते होणार अशी बातमी होती. यावेळी शहा यांच्या उपस्थितीत पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडेल, असंही म्हटलं जात होतं.

फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुका

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. ज्यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड सारख्या राष्ट्रीय स्थरावरील प्रमुख महापालिकांचा समावेश आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेहमीच आक्रमक असतो आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचा देखील निवडणुकींच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग असतो. मात्र सध्यस्तिथित असे दिसते आहे की अमित शहांचा पुणे, महाराष्ट्राचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, किंवा रद्द झालाय. त्यामुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अमीत शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले असावेत.

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी नगरसेवक आणि आमदारांची काही दिवसांपुर्वी बैठक झाली होती. बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना मिशन मोडवर गती देण्याचे आवाहन करण्यात आले हेते.

2014 च्या राज्यात विधानसभा निवडणुकीत, भाजपने पुणे शहरातील सर्व सहा जागा जिंकल्या होत्या, तर 2017 च्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये मध्ये जोरदार विजय मिळवला होता. मात्र, यंदा राज्यात भाजप एकटा आहे आणि मविआ सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपसाठी यंदाची लढत कठीण आहे.

इतर बातम्या

‘ठाकरे सरकार घरात लपले, तेव्हा कोरोनाच्या कडेलोटातून केंद्राने सावरले’, भाजपा खासदार डॉ. हीना गावित यांचा घणाघात

VIDEO | पंतप्रधान मोदींनी केलं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन; कार्यक्रमात योगींची शेतकरी आंदोलनावर जोरदार टीका

ज्या आमदारासोबत राहुल गांधींच्या लग्नाच्या वावड्या उठल्या त्यांचाही भाजप प्रवेश, कोण आहेत अदितीसिंह?