फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर, आदित्य ठाकरे घरात बसून टीका करण्यात व्यस्त, नवनाथ बन यांचा आरोप..
टिपू सुलतान वादावरून संजय राऊतांवर टिका करत बन यांनी म्हटले की, संजय राऊत यांना औरंगजेबानंतर आता टिपू सुलतानचा पुळका आला आहे. टिपू सुलतानच्या इतिहासाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट आहे.

भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केले. बन यांनी म्हटले की, दुष्काळाच्या संकटात देवाभाऊंचे सरकार आणि मोदीजींचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. देवेंद्रजी फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदतीचा आधार देत आहेत. दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. मात्र, आदित्य ठाकरे यांनी घरात बसून टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी स्वतः काय केले, हे सांगावे. संजय राऊतांबद्दल बोलताना बन यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची मदत, दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि पंचनाम्यांद्वारे भरघोस मदतीचे निर्णय घेतले आहेत. कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्राने अधिक मदत केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या संजय राऊतांनी सरकारवर टीका करण्याऐवजी आत्मचिंतन करावे.
टिपू सुलतान वादावरून संजय राऊतांवर टिका करत बन यांनी म्हटले की, संजय राऊत यांना औरंगजेबानंतर आता टिपू सुलतानचा पुळका आला आहे. टिपू सुलतानच्या इतिहासाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. हिंदूविरोधी शासकांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि उबाठा गटाने करू नये. अशा भूमिकेला जनता योग्य उत्तर देईल.
महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ठाम भूमिका आहे. आगामी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल. देशातील विविध पक्ष या भूमिकेला पाठिंबा देत असताना संजय राऊत मात्र महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ उभे राहणाऱ्यांची बदनामी करत आहेत.
सोन्याच्या खरेदीबाबत मोदींचे आवाहन त्यावर राऊतांनी टीका केली. यावर बोलताना बन यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीबाबत केलेल्या आवाहनातून देशहिताची भूमिका मांडली होती. त्यांच्या आवाहनाचे महत्त्व जनतेला आज लक्षात येत आहे. दुसरीकडे संजय राऊत यांची सातत्याने चुकीची ठरणारी भाकिते आणि जनतेची दिशाभूल करण्याची प्रवृत्ती यावरून त्यांच्यावर टीका.
पैसा देऊन आमदार-खासदार विकत घेता येत नाहीत. त्यासाठी जनतेचे प्रेम आणि विश्वास संपादन करावा लागतो. भाजप आणि एनडीए जनतेची कामे करून विश्वास मिळवत आहेत. दुसरीकडे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पैशाच्या जोरावर राजकारण करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे.
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपच्या टार्गेटची चर्चा करण्याऐवजी काँग्रेसला मिळणाऱ्या कथित परदेशी निधीबाबत पारदर्शकता दाखवावी. राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांचा उद्देश आणि परदेशी निधीबाबत काँग्रेसने जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे. आनंदराज आंबेडकर यांच्या विधानावर बोलताना बन यांनी म्हटले, आनंदराज आंबेडकर हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. मात्र, मराठवाडा दौऱ्यात त्यांनी केलेले वक्तव्य अयोग्य असून त्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही. त्यांनी यापुढे अशा प्रकारची वक्तव्ये टाळून जबाबदारीने भूमिका मांडावी.