भाजप नगरसेविकेच्या पतीला भयानक मारहाण, घटनेचा Video Viral

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. आता नेमका वाद काय होता जाणून घ्या...

भाजप नगरसेविकेच्या पतीला भयानक मारहाण, घटनेचा Video Viral
बीड
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 12, 2026 | 10:33 AM

नगरपालिका निवडणुकीतील पराभवाचा राग आणि राजकीय वादातून एक भयानक घटना घडल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये एका भाजप नगरसेविकेच्या पतीला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता नेमकं काय घडलं जाणून घ्या…

नेमकी घटना काय?

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर भाग्यश्री देशपांडे या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचे पती सागर देशपांडे हे शहरातील एका रस्त्यावर उभे राहून फोनवर बोलत असताना पाच जण त्यांच्याकडे आले. या पाच जणांनी सागर देशपांडे यांच्याशी वाद घालत त्यांना घेरले आणि लगेचच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. निवडणुकीतील जुन्या राजकीय वादाचा मुद्दा पुढे करून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

भररस्त्यात सुरू असलेल्या या मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

पोलिसांची कारवाई

या प्रकरणी पीडित सागर देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बीड शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या पाचही संशयितांविरुद्ध मारहाण, धमकी आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याचे गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हल्ला नगरपालिका निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यामुळे करण्यात आला असावा, अशी चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, हल्ल्यामागे नेमके कोण सूत्रधार आहेत आणि यामागे आणखी काही राजकीय षड्यंत्र आहे का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

Follow Us