Hijab Ban: तर 30 वर्षांनंतर तुमच्या मुलींनाही हिजाब घालावा लागेल, भाजप नेते Anil Bonde यांचा इशारा

| Updated on: Mar 21, 2022 | 12:38 PM

कर्नाटक हायकोर्टाने हिजाब बंदी योग्य ठरवलेली आहे. शाळेमधील ड्रेस कोडबाबतचा अधिकार हा शाळा प्रशासनाचाच असल्याचं कर्नाटक हायकोर्टाने म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Hijab Ban: तर 30 वर्षांनंतर तुमच्या मुलींनाही हिजाब घालावा लागेल, भाजप नेते Anil Bonde यांचा इशारा
Follow us on

अमरावती: कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High Court) हिजाब बंदी योग्य ठरवलेली आहे. शाळेमधील ड्रेस कोडबाबतचा अधिकार हा शाळा प्रशासनाचाच असल्याचं कर्नाटक हायकोर्टाने म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप (bjp) नेते अनिल बोंडे (anil bonde) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परिस्थिती अशीच राहिली आणि असेच जर हातावर हात देऊन आपण उभे राहिलो तर 30 वर्षानंतर तुमच्या मुलींनाही इतर देशाप्रमाणे हिजाब, बुरखा घालावा लागेल, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. मोर्शी येथे ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला. तुळजापूरची भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली.अयोध्या, मथुरा व काशी विश्वनाथ येथे चित्र वेगळे आहे. कारण जिथं शिवाजी महाराज नव्हते, तिथं मंदिराच्या बाजूला मशीद तयार झाली, असं सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मोठ्या ताकदीने करावा, असं आवाहन बोंडे यांनी केलं.

एक गोष्ट लक्षात ठेवा. अमरावतीला आम्ही होतो, त्यावेळी आम्ही समर्थपणे ताकद दाखवली. तेव्हा ते तरुण होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण म्हणतो. कोणी कमी आवाजात म्हणतो, कोणी मोठ्या आवाजात म्हणतो. पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा आणि तुळजापूरची भवानी वाचली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना आपले पोरं पोरी मजबूत राहिले पाहिजे, याचंही भान ठेवलं पाहिजे, असं अनिल बोंडे म्हणाले.

कोर्टाचा निकाल काय?

शाळा आणि महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. 9 फेब्रुवारी रोजी मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, जस्टिस कृष्णा एस दीक्षित आणि जस्टिस जेएम खाजी यांच्या पीठाचं गठन करण्यात आलं होतं. शाळेच्या आत हिजाब घालण्यास परवानगी दिली पाहिजे. कारण हा त्यांच्या अस्थेचा भाग आहे, असं विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला होता. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही, असं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे.

हिजाबचा वाद काय आहे?

साधारण 23 दिवसांपूर्वी हा वाद सुरु झाला. कर्नाटकातील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घालण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी सांगितले की, हा वाद सुरु होण्यापूर्वी या महाविद्यालयात येणाऱ्या मुली हिजाब घालत नव्हत्या. हिजाब घातल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारला. याविरोधात मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारलाय. आमच्या धार्मिक आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी याचिका त्यांनी केली होती.

 

संबंधित बातम्या:

Goa Government Formation: सावंत आले तरी राणे दिल्लीतच, गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम?

इतके कसे मुर्दाड झालो, नाशिकच्या हॉस्पिटलने केवळ एका सहीसाठी अडवला पोलिसाचा मृतदेह!

Hindutva: भाजपवाले कधीपासून हिंदू झाले पाहावं लागेल, संजय राऊत यांचा खोचक टोला