Hindutva: भाजपवाले कधीपासून हिंदू झाले पाहावं लागेल, संजय राऊत यांचा खोचक टोला

आमचं हिंदुत्व कातडीचं आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व सालीचं आहे, अशी टीका भाजपने केली आहे. भाजपच्या या टीकेवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

Hindutva: भाजपवाले कधीपासून हिंदू झाले पाहावं लागेल, संजय राऊत यांचा खोचक टोला
भाजपवाले कधीपासून हिंदू झाले पाहावं लागेल, संजय राऊत यांचा खोचक टोलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 10:41 AM

मुंबई: आमचं हिंदुत्व  (hindutva) कातडीचं आहे आणि शिवसेनेचं (shivsena) हिंदुत्व सालीचं आहे, अशी टीका भाजपने (bjp) केली आहे. भाजपच्या या टीकेवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. बाप रे, होय का? छान… हे कधीपासून हिंदू झाले पाहावं लागेल, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा डिवचले आहे. यावेळी राऊत यांनी मनसेलाही टोला लगावला. कुणी काय करत असेल तर हा आपआपल्या बुद्धीचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या माताीत जन्म घेतला हे महत्त्वाचं. महाराज या मातीत जन्माला आले म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. बाकी इतर प्रांतांना भुगोल आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ज्यांना राजकारण करायचं त्यानी करावं. महाराजांचं व्यक्तिमत्व थोर आणि महान आहे. त्यांनी संपूर्ण देशाला दिशा दिली आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या दुश्मनांना एक धडा चारशे वर्षापूर्वी घालून दिला. महाराष्ट्र दुश्मानांपुढे झुकणार नाही, वाकणार नाही. महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी आणि कष्टकऱ्यांसाठी. दुश्मन अंगावर आला तर त्याची बोटं छाटली जातील, असा धडा महाराजांनी दिला. प्रतापगडावर तर अफजलखानाचा कोथळाच निघाला. 25 वर्ष लढून सुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रात मृत्यू पत्करावा लागला हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्र आणि देशाला माहीत आहे. महाराष्ट्राच्या दुश्मनांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

काहींना अचानक भगव्याचं प्रेम उफाळून आलंय

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी महाराजाच्या विचारातून, प्रेरणेतून शिवसेनेची स्थापना केली. आज जो भगवा फडकत आहे, सर्वांना जे भगव्याचं प्रेम अचानक उफाळून आलंय त्याचे प्रेरक आधी शिवाजी महाराज होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे कुणाल वाटत असेल दिल्लीच्या तख्ताचा वापर करून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील नेत्यांना झुकवायला लावू. त्यांनी परत एकदा आजचा अग्रलेख वाचला पाहिजे. शिवचरित्रंही त्यांना वाचलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या पुत्राला आमदारकीचे वेध; गुहागरमधून लढण्यास तयार

Aurangabad जिल्हा परिषदेवर आजपासून प्रशासक राज, सदस्यांचा निरोपसमारंभ, निवडणूका कधी?

Aurangabad | फारोळ्यात जलवाहिनी फुटली, सोमवारी शहरात कुठेही पाणी नाही, मंगळवारीही विस्कळीत पुरवठा!

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.