अभिजीत दिपके यांच्या आंदोलनावर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हटले मुंबई..
अभिजीत दिपके यांचे चार वाजता मुंबईत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. मात्र, दिपके आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यातच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपाच्या बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिली.

दुष्काळावर नुकताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, दुष्काळी भागातील सर्वेक्षण योग्य करा. सर्वांनी पंचनामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा, कुठेही चूक होऊ नये. उद्यापासून तीन दिवसांच्या दुष्काळ दाैऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, आम्हाला लवकरच शेतकऱ्यांना मदत द्यायची आहे. याकरिता आमचे सरकार काम करणार आहे. शेतकरी वेगळ्या परिस्थितीमध्ये आहे. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. जनावरे आहेत, चाऱ्याचे नियोजन महत्वाचे आहे. पुढच्या काळात जलसंधारणच्या माध्यमातून जे काही साठे आहेत, त्यांना मजबूत करायचे आहे. शेतकरी आणि शेतमजूराला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, हे बघायचे आहे.बँकांचे वागणे ज्याप्रकारचे आहे, ते योग्य नाही असे मला वाटते.
मी देखील त्यांना सांगणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले आहे. कोणत्याही बँकांनी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावायचा नाही. सावकारांनी शेतकऱ्यांना लुटायचे नाही. सावकारांनी जर शेतकऱ्यांना लुटले तर सरकार सोडणार नाही. म्हणून याकरिताही आम्हाला लक्ष द्यायचे आहे. या दुष्काळाला सर्वच पक्षांनी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी टीका न करता सर्वांची जबाबदारी शेतकरी आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी आहे.
प्रचंड दुष्काळात असलेला शेतकरी बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. राहिला प्रश्न मुंबईतील आंदोलनाचा तर माझे त्यांना एवढेच म्हणणे आहे की, आंदोलन हे राजकीय स्वरूपाचे होऊ नये. राजकीय आंदोलनातून कारण नसतानाही या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. मुंबईसारख्या राजधानी असलेल्या शहरात हे आंदोलन होत आहे.
आज चार वाजता अभिजीत दिपके यांचे आंदोलन आहे. शिवाजी पार्कात हे आंदोलन आहे. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही. शिवाय स्थानिक लोकही जोरदार विरोध करत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याकरिता देशभरात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पुकारले.
