अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांचा प्रवास; भाजपचा खळबळनजक आरोप
नवनाथ बन यांनी आरोप केला की, अजित पवारांचा अपघात झालेल्या विमानातून अजितदादा आणि रोहित पवारांनी दहा डिसेंबर 2025 रोजी दिल्ली ते नागपूर एकत्रित प्रवास केला होता. या विमानात सुमित कपूर व शांभवी हेच या विमानाचे पायलट - को पायलट होते'.

अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अजितदादांच्या अपघातानंतरही आरोपांची मालिका सुरूच आहे. रोहित पवार हे सातत्याने अजितदादांच्या अपघातावरून सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहे. व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस मदत करत असल्याचा आरोप नुकताच रोहित पवारांनी केला होता. रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणत अनेक गंभीर आरोप फडणवीसांनी केले होते. या आरोपांना भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांनी प्रवास केला होता, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
नवनाथ बन यांनी आरोप करत म्हटलं की, रोहित पवार आणि अजितदादांनी एकत्र विमानातून प्रवास केला होता. रोहित पवारांनी दिल्ली-नागपूर असा एकत्र दहा डिसेंबर 2025 रोजी प्रवास केला होता. रोहित पवारांनी व्हीएसआर विमानाने प्रवास केला होता. त्या विमानात सुमित कपूर, शांभवी हेच पायलट, को-पायलट होते. परंतु पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी व्हीएसआर विमानातून कधीही प्रवास केला नसल्याचे सांगितले होते. परंतु ते धांदात खोटे बोलत आहेत, असं म्हणत भाजप नेते नवनाथ बन यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे.