VIDEO: धीरज देशमुखांसाठी काँग्रेसची शिवसेनेसोबत फिक्सिंग? संभाजी पाटील निलंगेकरांचा गौप्यस्फोट

| Updated on: Jan 27, 2021 | 8:58 PM

या मतदारसंघात काँग्रेसला निवडून येण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिवसेनेनं इथं जनसंपर्क नसलेल्या नेत्याला उमेदवारी दिली आणि प्रचारही केला नाही | Sambhaji patil Nilangekar

VIDEO: धीरज देशमुखांसाठी काँग्रेसची शिवसेनेसोबत फिक्सिंग? संभाजी पाटील निलंगेकरांचा गौप्यस्फोट
Sambhaji Patil Nilangekar
Follow us on

लातूर: विधानसभा निवडणुकीवेळी लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत फिक्सिंग झाली होती, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji patil Nilangekar ) यांनी केला. मुंबईतील एका जागेच्या बदल्यात लातुर ग्रामीणची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. मात्र, या मतदारसंघात काँग्रेसला निवडून येण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिवसेनेनं इथं जनसंपर्क नसलेल्या नेत्याला उमेदवारी दिली आणि प्रचारही केला नाही, असे संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले. (BJP leader Sambhaji patil Nilangekar slams Shivsena and Congress)

ते बुधवारी लातुरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील या घटनाक्रमावर प्रकाश टाकला. राजकीय जीवनात काही क्षण वेदना देणारे असतात. माझ्याही जीवनात असाच एक क्षण होता.

लातूर ग्रामीणची भाजपाची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. संवेदनशील असलो तरी राजकीय क्षेत्रात मजबुतीने पुढे जात आहोत, मी बोलल्यानंतर माघार कधी घेत नाही, जे घडलो ते खरं सांगतो, लातूर ग्रामीणची जागा फिक्स झाली होती. भाजपची जागा शिवसेनेला गेली होती. आम्ही घरी बसून निवडून आलो हा काँग्रेसचा अविर्भाव फार छळत होता. शिवसेनेने ही जागा मागच्या दरवाज्याने काँग्रेसला दिली. शिवसेनेच्या या भूमिकेला मी तेव्हाही विरोध केला होता, असे संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

शिवसेनेची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात का?

गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सलग तिसऱ्यांदा लातूर ग्रामीण मतदारसंघ राखण्यात यश मिळवले होते. शिवसेनेने याठिकाणी काँग्रेसच्या धीरज देशमुख यांच्याविरुद्ध सचिन देशमुख यांना रिंगणात उतरवले होते.

मात्र, सचिन देशमुख यांनी काहीच प्रचार न केल्यामुळे धीरज देशमुख यांना फार कष्ट न करता विजय मिळाला. उमेदवारी दाखल झाल्यापासून धीरज देशमुख यांना केवळ मताधिक्याची चिंता होती. त्यानंतर ठरल्याप्रमाणे धीरज देशमुख यांनी 1,18,208 मतांच्या फरकाने दणदणीत विजय प्राप्त केला होता.

संबंधित बातम्या:

अभिमन्यू पवारांना विरोध, संभाजी निलंगेकरांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

कट्टर राजकीय विरोधक निलंगेकर आजोबा-नातू एकाच मंचावर

लातूर जिल्ह्यात 408 पैकी 300 ग्राम पंचायतींवर भाजप विजय खेचून आणेल, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा दावा

(BJP leader Sambhaji patil Nilangekar slams Shivsena and Congress)