लातूर जिल्ह्यात 408 पैकी 300 ग्राम पंचायतींवर भाजप विजय खेचून आणेल, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा दावा

राज्यात निवडणुका ग्रामपंचायतच्या असल्या तरी या निवडणुकांमध्ये आमदारांपासून अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच ताकद लावल्याचं पाहायला मिळतंय. याच निवडणुकांच्या निकालावर जमिनीवर कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे समोर येतंय.

लातूर जिल्ह्यात 408 पैकी 300 ग्राम पंचायतींवर भाजप विजय खेचून आणेल, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा दावा
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 5:01 PM

लातूर : राज्यात निवडणुका ग्रामपंचायतच्या असल्या तरी या निवडणुकांमध्ये आमदारांपासून अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच ताकद लावल्याचं पाहायला मिळतंय. याच निवडणुकांच्या निकालावर जमिनीवर कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे समोर येतंय. त्यात लातूरमध्ये भाजपची पकड असल्याचं दिसतंय. भाजपचे नेते, माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी तर लातूरमधील 408 पैकी 300 ग्रामपंचायतींवर भाजपचं वर्चस्व असेल असा दावा केलाय. असं असलं तरी सर्व ग्रामपंचायतींचे निकाल हाती यायला अजून काही वेळ लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण निकाल हाती आल्यानंतरच कुणाची किती ताकद हे स्पष्ट होणार आहे (BJP MLA Sambhaji Patil Nilangekar claim victory on 300 Gram Panchayat out of 408 in Latur).

लातूर जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यातील 25 निवडणुका आधीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित 383 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालं. त्याचा निकाल आज जाहीर होतोय. लातूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्ष मुसंडी मारताना दिसत आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती भाजपकडे येत असल्याचं दिसत आहे.

“305 ग्रामपंचायतींचे निकाल आलेत,त्यापैकी 198 ग्रामपंचायतींमध्ये भाजप”

भाजपचे नेते, माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, “लातूरमध्ये 408 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यापैकी 25 निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित 383 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागत आहे. त्यापैकीही 305 ग्रामपंचायतींचे निकाल हातात आलेत. त्यापैकी 198 ग्रामपंचायतींमध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे. मला निश्चित खात्री आहे 408 ग्रामपंचायतींपैकी भाजप 300 ग्रामपंयातींमध्ये विजय मिळवू शकतो, असं मी खात्रीने सांगतो.”

“निलंगा विधानसभेतील सर्व ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल लागले आहेत. शिवारपाळ तालुक्यात 27 पैकी 20 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा विजय झालाय. देवनीमध्ये 34 पैकी 24 ग्रामपंचायतींवर पूर्णपणे भाजपचा विजय झालाय. निलंगा विधानसभेत 48 ग्रामपंचायतींपैकी 31 ठिकाणचे निकाल हाती आलेत. त्यात केवळ बोटावर मोजण्यासारख्या 5-6 ग्रामपंचायती काँग्रेसकडे गेल्यात. ते वर्षानुवर्षे काँग्रेसचेच बालेकिल्ले होते आणि तेथे मिक्स निवडणुका झाल्या होत्या,” असंही निलंगेकर यांनी नमूद केलं.

“लातूरमध्ये 70 टक्केपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा”

संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, “आतापर्यंत घोषित झालेल्या निकालानुसार, लातूरमध्ये 70 टक्केपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झालाय. निलंगामध्ये तर 80 टक्के जागांवर भाजप निवडून आलाय. यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. निवडणुकीपुरतं राजकारण राहिल. निवडणुका झाल्यावर सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या दृष्टीने काम करावं. सर्व निवडून येणाऱ्या सदस्यांना शुभेच्छा. जे लढले त्यांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा. यानंतर आता सर्वांनी एकत्रित काम करावं.”

“निवळी हा साखर सम्राटांचा पट्टा आहे. हा काँग्रेसचा गड आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा कऱ्हाड यांच्या नेतृत्वात भाजपचं लातूर जिल्ह्य्यात काम झालं. त्यांनी काँग्रेसच्या गडात भाजपचा झेंडा फडकावलाय. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ही अशक्य असणारी गोष्ट आहे. साखर कारखाना आणि परिसरात रमेश कऱ्हाड यांच्या नेतृत्वात मोठमोठ्या ग्रामपंचायती निवडून आल्या. हा काँग्रेसला मोठा धक्का आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा आमचा कार्यकर्ता उभा राहिलाय,” असंही निलंगेकर म्हणाले.

हेही वाचा :

1949 पासून गाव बिनविरोध, पहिल्यांच निवडणूक, भाजपचा 7 पैकी 7 जागांवर विजय

मुनगंटीवारांना धक्का, एक ग्रामपंचायत वंचितकडे; अक्कलकोटमध्ये आठवलेंचे 34 उमेदवार विजयी

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : यशोमती ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला धक्का; फक्त ‘एवढ्याच’ ग्रामपंचायतींवर विजय

व्हिडीओ पाहा :

Non Stop LIVE Update
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.