AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिमन्यू पवारांना विरोध, संभाजी निलंगेकरांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

अरविंद निलंगेकर, शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अभिमन्यू पवारांना (Latur Sambhaji Nilangekar Abhimanyu Pawar) विरोध केला. विशेष म्हणजे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे स्वतः या नाराज कार्यकर्त्यांमध्ये बसलेले पाहायला मिळाले.

अभिमन्यू पवारांना विरोध, संभाजी निलंगेकरांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Oct 02, 2019 | 5:14 PM
Share

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार (Sambhaji Nilangekar Abhimanyu Pawar) यांना औसा येथून उमेदवारी दिल्याने भाजपाचा एक गट रस्त्यावर उतरला आहे. इच्छुक उमेदवार किरण उटगे, बजरंग जाधव, अरविंद निलंगेकर, शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अभिमन्यू पवारांना (Sambhaji Nilangekar Abhimanyu Pawar) विरोध केला. विशेष म्हणजे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे स्वतः या नाराज कार्यकर्त्यांमध्ये बसलेले पाहायला मिळाले.

लातूर जिल्ह्यात भाजपात दोन गट असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. या संतप्त कार्यकर्त्यांची समजूत भाजपा कशी काढणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपला निलंगा मतदारसंघ तर शाबूत ठेवलाच आहे, मात्र त्यांनी औसा इथे जास्त लक्ष घातलं आहे. त्यांचे बंधू अरविंद निलंगेकर यांना औसा येथून उमेदवारी मागण्यात आली होती.

गेल्या काही वर्षांपासून अभिमन्यू पवार हे औसामध्ये विकासकामं करत होते. त्यांनी आपला संपर्क देखील वाढवला होता. त्यानंतर आता उमेदवार म्हणून अभिमन्यू पवार औसाच्या जनतेला सामोरे जाणार आहेत. या काळात त्यांनी मतदारसंघातील जनतेमध्ये जाण्यासाठी मंत्रालयातून मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि जनतेची कामं केली.

औसा – काँग्रेसचा बालेकिल्ला

औसामध्ये बसवराज पाटील मुरूमकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बसवराज पाटील यांना 64237 मतं मिळाली. तर, शिवसेनेच्या दिनकर माने यांना 55,379 मतं मिळाली. पण, मोदी लाट असताना आणि स्बळावर लढत भाजपला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

2014 मध्ये भाजप उमेदवार पाशा पटेल यांना 37,414 मतं मिळाली. म्हणजेच काँग्रेस आणि भाजपमध्ये जवळपास 30 हजार मतांचा फरक दिसून येतो. पण, यंदा युती असल्याने भाजपला विजय मिळणार की काँग्रेस विजयी घोडदौड कायम राखणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

2009 आणि 2004 मध्ये शिवसेनेचे दिनकर माने या ठिकाणावरून विजयी झाले. पण, 2009 आणि 2014 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. औसामध्ये 2014 च्या आकडेवारीनुसार एकूण मतदार हे 2,58,311 आहेत. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ही 1,38,497 आणि महिला मतदारांची संख्या 1,19,814 आहे. आपण मागील सहा वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडून येऊ, असा विश्वास अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केलाय.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा