VIDEO: कार्यकर्त्याच्या लग्नात भाजप आमदाराचा डान्स; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बदनापूर तालुक्यातील लोणगावच्या एका कार्यकर्त्याचे भोकरदन तालुक्यातील उमरखेड इथे लग्न होतं. | BJP MLA dance

VIDEO: कार्यकर्त्याच्या लग्नात भाजप आमदाराचा डान्स; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कार्यकर्त्यांनी आमदार नारायण कुचे यांना नाचण्याचा आग्रह धरला. नारायण कुचे यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता डीजेवर चांगलाच ठेका धरला.
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 9:35 AM

जालना: जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार नारायण कुचे (BJP MLA Narayan Kuche) यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नारायण कुचे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला आहे. हा व्हीडिओ त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या लग्नात चित्रीत करण्यात आला होता. (BJP MLA viral dance on social Media)

बदनापूर तालुक्यातील लोणगावच्या एका कार्यकर्त्याचे भोकरदन तालुक्यातील उमरखेड इथे लग्न होतं. या लग्नाला आमदार नारायण कुचे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार नारायण कुचे यांना नाचण्याचा आग्रह धरला. नारायण कुचे यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता डीजेवर चांगलाच ठेका धरला. बराचवेळ ते कार्यकर्त्यांच्या गर्दीत हात उंचावून नाचत होते. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजप आमदार सुरेश धसांच्या गाण्याने काळजाला हात

काही दिवसांपूर्वीच भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांचाही एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यांनी ‘सुख के सब साथी, दुःख में ना कोई’ हे गाणं सुरेश धस यांनी आपल्या अनोख्या अंदाजात सादर केलं होतं.

सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. निमंत्रित कवींच्या संमेलनात सहभागी झालेल्या सुरेश धस यांना कार्यकर्त्यांनी कविता प्रस्तुत करण्याची विनंती केली. सुरेश धस यांनी मला कविता येत नाही, पण मी गाणं म्हणतो, असं सांगत सूर छेडले होते.

VIDEO | सुख के सब साथी, दुःख में ना कोई, भाजप आमदार सुरेश धसांच्या गाण्याने काळजाला हात

तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय: अमृता फडणवीस

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी गाणं, तर कधी सोशल मीडियावरील त्यांचे ट्विट्स. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis New Song) यांच्या चाहत्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे. कारण महिन्याभराच्या आतच त्यांचं आणखी एक गाणं रिलीज होणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने मिसेस फडणवीसांचं नवीन गाणं प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशारा दिला. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या.

(BJP MLA viral dance on social Media)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.