
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सध्या वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी नुकंतच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “परळी आणि अंबाजोगाईत काम न करता बिलं उचलण्यात आली. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना अनेक बोगस बिल उचलली”, असा आरोप सुरेश धस यांनी केला.
सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप केले. “परळी आणि अंबेजोगाई येथील कामे न करता कोट्यवधी रुपयांची बिले उचलली”, असा आरोप सुरेश धस यांनी केला.
“पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं. त्या कालावधीत काही, कोण कोण कार्यकारी अभियंता, जेई. यात मला वाटतं मीडियाची मेमरी स्ट्राँग असेल. एक कार्यकारी अभियंता कोकणे म्हणून त्याने जिल्हाधिकाऱ्याने पिस्तुल मागितलं होतं. यावर सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेत्याने सभागृहात टिप्पणी केली होती. डीपीडीसीतून २०२१ ते २०२२ अंतर्गत यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे होते. कोरोनाचा कालावधी. परळी आणि अंबेजोगाई येथील कामे न करता कोट्यवधी रुपयांची बिले उचलली”, असे सुरेश धस यांनी म्हटले.
दिनांक ३०-१२-२०२१ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई २ कोटी ३१ लाख
दिनांक १८ मार्च २२ रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग बीड १० कोटी ९८ लाख
२५ मार्च २२ कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबेजोगाई ६ कोटी ५९ लाख
२६ मार्च २२ कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद क्रमांक -२ १६ कोटी ४८ लाख रुपये
३१ मार्च २२ कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड, १ कोटी ३४ लाख
असे एकूण ३७ कोटी ७० लाख रुपये या कामांची बोगस बिले. संजय मुंडे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवले. ते डेप्युटी इंजिनियर होते. त्यावेळी त्यांना चार्ज दिले. २५ जून २२ रोजी उपअभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता विभागाचा प्रभारी कार्यभार दिला. त्यांनीही बिले उचलून दिली, असाही आरोप सुरेश धस यांनी केला.
“मोडस ऑपरेंडी समजून घ्या. कलेक्टरकडून पैसे जिल्हा परिषदेला डम्प करायचे. जिल्हापरिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला डायव्हर्ट करायचे. ते पैसे ३१ मार्चलाच उचलण्याची गरज नाही. ते उचलले २५ जून २२ रोजी उचलले. एकाच दिवशी ३७ कोटी ७० लाख रुपये उचलले. एक रुपयाचंही काम न करता ते उचलले. माझ्याकडे कामांची यादी आहे. पीडीएफही आहे. ते पाहा”, असेही सुरेश धस म्हणाले.
“एक रुपयाचं काम न करता ३७ कोटी रुपये ७० लाख उचलले. सार्वजनिक बांधकाम विभाग अंबेजोगाई, रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत जानेवारी २३ मध्ये १३-१२-२१ रोजी नऊ कामाचे १५ कोटी, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी एका कामाचे १ कोटी २० लाख, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी १६ कोटी २० लाख रुपये रस्ते दुरुस्ती विशेष कार्यक्रमांतर्गत काडीचं काम न करता पैसे दिले आहे. हॅम अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले ५९ रुपयाचे रस्ते काम सुरू असून त्यात ६ कोटी ३० लाख रुपयाचं आणखी एक काम मंजूर करून आणले. काम केल्याचं दाखवलं. परळी पूस बर्दापूर रस्ते कामावर ५ कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे”, असेही सुरेश धस यांनी म्हटले.
“या कार्यालयाने पाहणी केली, तपासणी केली. त्यावेळी या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले. त्यांनी सांगितलं की कक्ष अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने एकाच कामावर डबल पैसे उचलल्याचं सांगितलं. त्यावर काहीही कारवाई झाली नाही. शिवशंकर स्वामी हे कार्यकारी अभियंता, उपअभियंता संजय मुंडे आणि कनिष्ठ अभियंता अतुल मुंडे हे त्यावेळी कार्यरत होते.
डीपीडीसी जिल्हाधिकारी बीड यांनी २५ मार्च २०२० रोजी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या. ७० कामाच्या. परळी मतदारसंघातील. ५७ कामाच्या प्रशासकीय रद्द केल्या. या कामांचे एकूण म्हणजे ५७ कामाचे प्रमा रद्द केल्यावरही आकाने १४ कोटी ४३ लाख ४५ हजाराचे बिल उचलून मोकळे झाले. प्रशासकीय मान्यता रद्द केलेली असताना हे पैसे उचलले. हा गंभीर गुन्हा आहे. परळी मतदारसंघात १३-१२-२०२१ ते २०२३ पर्यंत मविआ सरकार असतानाच्या काळात पहिलं ३७ कोटी ७० लाख उचलले बोगस, दुसरे १४ कोटी ४६ लाख बोगस बिले देऊन उचलले. तिसरं १६ कोटी २० लाख, चौथे पाच कोटी बर्दापूर पूसवर, असे एकूण ७३ कोटी ३६ कोटी बोगस बिल दाखवून उचलले आहे”, असेही सुरेश धस यांनी म्हटले.