ठाकरे बंधू-फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा, भाजपाची पहिली प्रतिक्रिया आली, बडा नेता म्हणाला एकत्र आले तर..

ठाकरे बंधू तसेच फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली.

ठाकरे बंधू-फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा, भाजपाची पहिली प्रतिक्रिया आली, बडा नेता म्हणाला एकत्र आले तर..
uddhav thackeray and raj thackeray and uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 8:35 PM

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या तर महायुतीला दोन जागा मिळाल्या. दरम्यान, या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीमध्ये एकमेकांवर खापर फोडले जात आहे. शिवसेनेने समन्वय साधला असता तर आणखी दोन जागा जिंकता आल्या असत्या, असा दावा भाजपाने केलाय. दरम्यान एकीकडे असे आरोप-प्रत्यारोप होत असताना दुसरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मनेसेचे प्रमुख राज ठाकरे एका कार्यक्रमासाठी एकाच मंचावर आल्या आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाआधी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झालीय. या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावरच आता भाजपाने आपली भूुमिका स्पष्ट केलीय.

वेगळा अनुमान लावणे घाईचे ठरेल

ठाकरे बंधू तसेच फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्र एवढा संकुचित विचार करणारा नाही. एका कार्यक्रमात राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असतील तर लगेच काहीतरी वेगळं राजकारण होणार, असा अनुमान लावणे अत्यंत घाईचे आहे. व्यंगचित्राशी संबंधित पुस्तकाचे प्रकाशन होते. दोन्ही ठाकरे बंधू हे कलाकार आहे. उद्धव ठाकरे फोटोग्राफर आहेत, राज ठाकरे व्यंगचित्रकार आहेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात तिन्ही नेते भेटले म्हणून उद्या काहीतरी वेगळं होणार आहे, असं काही नाही. एका कार्यक्रमाला आलो की चहापान करत असतो. नवं राजकीय समीकरण जन्माला येईल, असं समजणं घाईचं आहे,” असं दरेकर यांनी स्पष्ट केलं.

Loading...

तसेच, आमची युती भक्कम आहे. आमच्या युतीत तडा गेलेला नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार समन्वयाने काम करतील. स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय घेतले जातात. त्याचा युतीवर काहीच परिणाम होणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या बंद दाराआड झालेल्या चर्चेवर भाष्य केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहणार हे पूर्वनियोजित होते. एखाद्या कार्यक्रमासाठी एका मंचावर नेते येत असतील आणि त्या कार्यक्रमाआधी नेतेमंडळी चहापानासाठी एकत्र येत असतील तर त्यातून काही वेगळा अर्थ काढला पाहिजे असं मला वाटत नाही, असं अंधारे यांनी सांगितलंय. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us