Garjana Morcha : ‘हा गर्जना मोर्चा नव्हे हा गजकरण मोर्चा’, मोर्चाचं जेवढं अंतर त्यापेक्षा लोक मॉर्निंग वॉकला जास्त चालतात, भाजपने उडवली खिल्ली

Garjana Morcha : "उद्धव ठाकरे घरात बसून होते, राज ठाकरे कॉमेडी करतात म्हणून निवडून द्यायचं का? अमित ठाकरेंनी मोदींचा फोटो काढला म्हणून निवडून द्यायचं का? तुमच्याकडे कुठला मुद्दा नाही. म्हणून ही वायफळ बडबड आहे. हा गर्जना मोर्चा नव्हे हा गजकरण मोर्चा आहे"

Garjana Morcha : हा गर्जना मोर्चा नव्हे हा गजकरण मोर्चा, मोर्चाचं जेवढं अंतर त्यापेक्षा लोक मॉर्निंग वॉकला जास्त चालतात, भाजपने उडवली खिल्ली
Bjp Slam Garjana Morcha
| Updated on: Oct 04, 2026 | 10:39 AM

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गर्जना मोर्चा निघणार आहे. मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय या मोर्चाचा मार्ग असणार आहे. या गर्जना मोर्चाआधी भाजपने अत्यंत बोचरी, जिव्हारी लागणारी टीका केली आहे. “उबाठा गट आणि मनसेचा हा गर्जना मोर्चा नाही, गजकरण मोर्चा आहे. मूळात यांची संघटनेत पकड नाहीय. जेव्हा SIR प्रक्रिया सुरु झाली, तेव्हा बीएलए 2 निवडणूक आयोगासाठी सादर करायचे होते. राजकीय पक्षांनी ते द्यायचे होते. भाजपने बीएलए 2 कार्यकर्ते दिले. उबाठा गटाला 40 टक्क्याच्यावर बीएलए 2 नेमता आले नाहीत. मनसेला 10 टक्केही बीएलए 2 देता आले नाही. मूळात यांची संघटनात्मक बांधणी नाहीय, कार्यकर्ते नाहीयत. राजकारणात यांच्याकडे मुद्दा नाहीय. यांनी हिंदुत्ववाद सोडून दिलाय. हिंदुत्वाच्या ज्या विचारावर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र निवडून देत होता. त्या बाळासाहेबांचा विचार नाकारला म्हणून लोकांनी यांना सोडून दिलं” अशी टीका भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली.

“आता सोनिया गांधींच्या चरणावर जात आहेत. काँग्रेसच्या अजेंड्यावर तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही. हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षातच येत नाहीय. म्हणून पराभवाचं खापर कोणावर फोडायचं, तर निवडणूक आयोगावर असा दुटप्पीपणा सुरु आहे. हा गर्जना मोर्चा नाही, गजकरण मोर्चा आहे. याआधी बांधणी करावी, संघटना बांधावी, बीएलओ द्यावेत. यांना खासदार टिकवता येत नाहीयत. महाराष्ट्रात लोकसभेला 30 खासदार निवडून दिले. 9 खासदार हे उद्धव ठाकरेंचे होते. त्यातले 6 खासदार सोडून गेले, त्याला निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार जबाबदार आहेत का?” असा सवाल भाजपने विचारला.

Loading...

तुम्हाला कुठल्या मुद्यावर मतदान करायचं?

“माझा राज ठाकरेंना एक सवाल आहे, अमित ठाकरेंचा पराभव कुणी केला. उबाठा गटाने केला. महेश सावंत निवडून आले. ते भाजपचे नव्हते , उबाठाचे होते. अमित ठाकरे आणि मनसेची भूमिका महेश सावंत यांच्या विरोधात आहे का? कारण महेश सावंत याच निवडणूक प्रक्रियेतून निवडून आले. निवडणूक आयोगाने निवडून दिलं. महेश सावंत यांची निवडणूक योग्य असेल तर अमित ठाकरे त्यांच्याविरोधात गर्जना करणार का?” असा सवाल नवनाथ बन यांनी विचारला. “मूळात ठाकरेंना जनतेने नाकारलं आहे. देवा भाऊ, मोदी महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करतायत. “आम्ही रोज लोकांमध्ये असतो गटर, मीटर, वॉटर हे मुद्दे असतात. 370 कलम हटवलं, मुंबईत एक बॉम्बस्फोट झाला नाही या सगळ्या मुद्यावर लोक मतदान करतात. तुम्हाला कुठल्या मुद्यावर मतदान करायचं?” असा सवाल भाजपने विचारला.

‘दोन ठाकरेंचा मोर्चा गल्लीत चर्चा’

‘दोन ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा’ अशी टॅगलाइन दिलीय. त्यावर ‘दोन ठाकरेंचा मोर्चा गल्लीत चर्चा’ अशी खिल्ली उडवली. “आधी मोर्चा जेजे कडून निघून महापालिका मुख्यालयापर्यंत जाणार होता. मग त्यांनी गल्ली निवडली. मेट्रोची गल्ली ते महापालिका मुख्यालय. यांच्या मोर्चाचा जेवढा मार्ग आहे, त्या अंतरापेक्षा मॉर्निंग वॉकला लोक जास्त चालतात” अशी खिल्ली भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उडवली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us