एमआयएमचा आवाज दाबण्यासाठी आता काळी जादू; कार्यालयावर हळद-कुंकूचा मारा

| Updated on: May 31, 2022 | 10:23 PM

गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार वारंवार घडत असल्याने महेशकुमार कांबळे यांनी आता विरोधकांना आपल्या कामातूनच त्यांनी थेट आव्हान दिले आहे.काळी जादूने आपले काम थांबणार नाही, ज्या विरोधकांना माझ्या कामाचा त्रास होतो त्यांनीही आपल्या कामातून मला विरोध करावा असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एमआयएमचा आवाज दाबण्यासाठी आता काळी जादू; कार्यालयावर हळद-कुंकूचा मारा
Follow us on

सांगलीः मिरजेत एमआयएम पक्षाच्या (MIM party) जिल्हा कार्यालयावर काळ्या जादू (Balck Magic) टोण्याचा प्रकार घडल्यामुळे सांगलीत आज दिवसभर या प्रकारचीच चर्चा होती. काळ्या जादूमुळे माझं काही होणार नाही समोर येऊन कामातून विरोध करा असे डॉ. महेशकुमार कांबळे (Dr. Maheshkumar Kamble) यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले आहे. मिरजमध्ये एमआयएम पक्षाच्या जिल्हा कार्यालयाबाहेर काळ्या जादू टोण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये काळे उडीद, हळद, कुंकू फेकून ही काळी जादू केल्याचे एमआयएम पक्षाचे जिल्हा कार्यालय उघडताना जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या निदर्शनास आले. असाच प्रकार मागच्या काही महिन्यामध्येसुध्दा झाला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केले असता आज आणि प्रकार घडला आहे.

या घटनेनंतर डॉ. महेशकुमार कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधकांना थेट आव्हान केले आहे की जर माझ्या कामामुळे मी मोठा होत असेल तर मला बाजूला सारण्यासाठी समोर येऊन किंवा चांगली कामे करुन विरोध करावा अशी काळी जादू करुन विरोध करु नका असे खुले आव्हान महेशकुमार कांबळे यांनी विरोधकांना केले आहे.

अंधश्रद्धेशी संबंधित अनेक प्रकार

महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आणण्यात आल्यानंतरही अंधश्रद्धेशी संबंधित अनेक प्रकार सुरूच असल्याचं पाहायला मिळतं. सांगली जिल्ह्यात तर थेट राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर काळी जादू करण्यात आल्याची घटना आता समोर आली आहे. सोमवती अमावस्याच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील एमआयएम पक्षाच्या कार्यालयासमोर हा जादूटोणा करण्यात आला आहे. या घटनेमुळे सांगली आणि मिरज परिसरात खळबळ उडाली आहे.

जादूने आपले काम थांबणार नाही

गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार वारंवार घडत असल्याने महेशकुमार कांबळे यांनी आता विरोधकांना आपल्या कामातूनच त्यांनी थेट आव्हान दिले आहे. काळी जादूने आपले काम थांबणार नाही, ज्या विरोधकांना माझ्या कामाचा त्रास होतो त्यांनीही आपल्या कामातून मला विरोध करावा असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारणात आज दिवसभर या घटनेचीच चर्चा होती.