Maharashtra Election News LIVE : पालिका निवडणुका होत नाही तोच, स्विकृत नगरसेवकपदासाठी पक्षात लॉबिंग सुरू

देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल... नाशिक महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मनसेकडून आत्मपरीक्षणाला सुरुवात झाली आहे.... अशा राजकीय बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळेल...

Maharashtra Election News LIVE : पालिका निवडणुका होत नाही तोच, स्विकृत नगरसेवकपदासाठी पक्षात लॉबिंग सुरू
| Edited By: | Updated on: Jan 19, 2026 | 12:08 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Jan 2026 12:15 PM (IST)

    कल्याण–डोंबिवलीत ठाकरे बंधूंचे नगरसेवक ठरणार ‘गेम चेंजर’

    कल्याण–डोंबिवलीत ठाकरे बंधूंचे नगरसेवक ‘गेम चेंजर’ ठरणार आहेत. महायुतीला बहुमत असूनही महापौर पदावरून भाजप–शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. भाजप 50 तर शिवसेना 53 जागांवर असून दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी सुरू आहे. भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज आहे.

    इतर पक्षांतील नगरसेवक फोडण्यासाठी बार्गेनिंग सुरू आहे. KDMC मध्ये ठाकरेचे 11 मनसेचे पाच काँग्रेसचे 2 राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 1 असे 19 नगरसेवक आहेत. यात शिंदे गटाचा ठाकरे गटाच्या 3 नगरसेवकांशी संपर्कात तर मनसे देखील देखील शिंदे ला पाठिंबा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 19 Jan 2026 12:05 PM (IST)

    पुण्यात निवडून आलेले नवनिर्वाचित सर्व नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला

    पुणे महापालिकेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भेटण्यासाठी बोलावलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आले आहेत.

  • 19 Jan 2026 11:53 AM (IST)

    आजच महापालिका निवडणुकीनंतरचं गॅझेट काढा, शासनाच्या नगरविकास विभागाचे आदेश

    आजच महापालिका निवडणुकीनंतरचं गॅझेट काढा, असे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. पालिका प्रशासन गव्हर्नमेंट प्रिंटींग प्रेसला जाऊन गॅझेट काढणार असून गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय पक्षांना नोंदणी करावी लागते. यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींनी माहिती दिली आहे.

     

     

     

     

  • 19 Jan 2026 11:42 AM (IST)

    पालिका निवडणुका होत नाही तोच, स्विकृत नगरसेवकपदासाठी पक्षात लॉबिंग सुरू

    पालिका निवडणुका होत नाही तोच, नामनिर्देशित (स्विकृत) नगरसेवकपदासाठी पक्षात लाॅबिग सुरू झाली आहे. २२७ निवडून आलेले तर १० नामनिर्देशित सदस्य असे एकूण २३७ नगरसेवक सभागृहात उपस्थित असणार आहेत. नामनिर्देशित सदस्य मिळावे यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्टींसाठी मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.

    निवडून आलेल्या नगरसेवकांच्या आकडेवारीनुसार भाजपला स्विकृत नगरसेवक ४ शिवसेना शिंदे गटाला १, ठाकरेंना २ मनसेने पाठिंबा दिल्यास ३ आणि अपक्षांनी काॅग्रेसला पाठींबा दिला तर ३ त्यांना मिळू शकतात. आता पालिका मुख्यालयातील सभागृहाची आसन व्यवथा २२७ ची असून १० नामनिर्देशित सदस्य वाढल्याने त्यांची आसन व्यवस्था करायची कुठे असा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे.

  • 19 Jan 2026 11:30 AM (IST)

    हाॅटेल ताजमध्ये नगरसेवकांची एकमेकांशी चर्चा 

    मुंबईच्या हाॅटेल ताजमध्ये नगरसेवकांची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. आज सर्व नगरसेवकांना त्यांचे पुरावे पुढील नियोजनासाठी सादर करायचे आहेत. रजिस्टर नोटरी, आधार, पॅन कार्ड, निवडणुक आयोग सर्टिफिकेट हे सर्व पुरावे सादर करायचे आहेत.

  • 19 Jan 2026 11:20 AM (IST)

    नाशिकमधल्या पिंपळगाव मोर इथं चारचाकी आयशर ट्रक स्लिप झाल्याची धक्कादायक घटना

    नाशिकमधल्या पिंपळगाव मोर इथं चारचाकी आयशर ट्रक स्लिप झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरील दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रक चालकाचा ताबा सुटला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाळूमुळे स्लिप होत थेट दुकानांमध्ये ट्रक घुसला. या अपघातात दोन जण जखमी झाले आणि एका दुकानाचं मोठं नुकसान झालं. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • 19 Jan 2026 11:10 AM (IST)

    मनपा निवडणुकीनंतर MIM ने जिल्हा परिषद निवडणुकीकडे वळवला मोर्चा

    छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीत भाजपपाठोपाठ एमआयएमने 33 जागा जिंकत मोठा विजय मिळवला. आता एमआयएमने आपला मोर्चा जिल्हा परिषद निवडणुकीकडे वळवला आहे. आज एमआयएमच्या वतीने जिल्हा परिषद निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. एमआयएमच्या दुवा फाउंडेशन इमारतीत मुलाखती पार पडणार आहेत.

  • 19 Jan 2026 10:56 AM (IST)

    दोन गटातच फोडाफोडी होणार – संजय राऊत

    आम्ही जेवायला जातो की ते कुठे जेवायला जातात, ते बघूया. काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाही. त्यामुळे आता फोडाफोडीचा खेळ शिंदे-भाजप यांच्यातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजून मज्जा येणार आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे

  • 19 Jan 2026 10:43 AM (IST)

    पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांचा ॲक्शन मोड; बारामती हॉस्टेलवर इच्छुकांची मोठी गर्दी

    पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असताना, अजित पवार यांनी पुण्यातील बारामती हॉस्टेलवर तळ ठोकला असून आज दिवसभर ते महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील शेकडो इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी हॉस्टेलवर दाखल झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी कोणाला मिळणार आणि पक्षाची रणनीती काय असेल, याबाबत अजित पवार थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळे बारामती हॉस्टेल सध्या राजकीय हालचालींचे केंद्र बनले आहे.

  • 19 Jan 2026 10:33 AM (IST)

    नाशिकमधील AB फॉर्म वादाची होणार चौकशी, 2 सदस्यांची समिती नियुक्त

    नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ७२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी पक्षाने आता पराभूत झालेल्या जागांकडे आपला मोर्चा वळवला आहे. अंतर्गत वाद आणि नियोजनातील त्रुटींमुळे हक्काच्या २० जागा गमवाव्या लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष पक्षाने काढला असून, त्याचे सखोल अवलोकन केले जाणार आहे. विशेषतः उमेदवारी अर्ज भरताना झालेला AB फॉर्म’चा गोंधळ आणि पक्षांतर्गत झालेल्या बंडाळीची चौकशी करण्यासाठी दोन जणांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला गोपनीय अहवाल थेट मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले किंवा तटस्थ राहून नुकसान केले, त्यांच्यावर या अहवालानंतर कठोर कारवाईचे संकेत मिळत असल्याने नाशिक भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

  • 19 Jan 2026 10:23 AM (IST)

    नगरसेवकांना डांबून का ठेवलं, याचं उत्तर द्या; संजय राऊतांचा खोचक टोला

    आमचे नगरसेवक हे आपआपल्या घरी आहे. त्यांची बैठक मातोश्रीवर होते. ते आपपल्या गाडीने येतात आणि निघून जातात. तुमच्या नगरसेवकांना डांबून का ठेवलं गेलं, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

  • 19 Jan 2026 10:13 AM (IST)

    आधी सत्तेतून बाहेर पडा, मगच एकत्र येण्याचं बोला, उत्तम जानकरांचा कडक पवित्रा

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पंढरपुरातून आक्रमक भूमिका मांडली आहे. अजित पवार सत्तेत असेपर्यंत राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य नाही, असे सांगितले. सत्तेत असताना एकत्र येणे म्हणजे बिर्याणीत गुळवणी ओतल्यासारखे होईल,” अशी बोचरी टीका केली. जर एकत्र यायचे असेल, तर अजित पवारांना आधी सत्तेतून बाहेर पडणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अजित पवार गटाकडे कोणतेही ठोस व्हिजन नसल्याचा आरोप करत जानकरांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरही सवाल उपस्थित केले. ईव्हीएमची तपासणी आणि प्रोग्राम पारदर्शकपणे दाखवला नाही, तर सोलापूर जिल्ह्यात निवडणूक होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला.

  • 19 Jan 2026 10:04 AM (IST)

    धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक: अर्ज भरण्यासाठी शेवटचे ३ दिवस, युती-आघाडीचा पेच कायम

    धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ तीन दिवस उरले आहेत. मात्र राजकीय वर्तुळात अद्याप जागावाटपाचा घोळ मिटलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागांच्या गणितावरून संभ्रम कायम असून, शिवसेनेत तर दोन वेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. ५५ जिल्हा परिषद गट आणि ११० पंचायत समिती गणांसाठी आतापर्यंत १०७५ इच्छुकांनी अर्ज खरेदी केले असले, तरी अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीची आज एक महत्त्वाची बैठक होत असून त्यात जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

  • 19 Jan 2026 09:50 AM (IST)

    मुंबईत पुढील तीन दिवस थंडी असणार, तापमानात मोठी घट

    मुंबईत पुढील तीन दिवस थंडीचे असणार, तापानात घट होणार आहे, आज किमान तापमान 18 अंशावर पोहोचलंय… मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येतोय… तर या थंडीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासाळलाय. गुणवत्ता निर्देशांक 173 च्या घरात पोहोचलाय…पीएम 2.5 चा प्रमाण ८८ इतकं आहे तर पी एम 10 चे प्रमाण १११ वर पोहोचलं आहे

     

  • 19 Jan 2026 09:40 AM (IST)

    जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना नेत्यांच्या युती करण्याच्या सूचना

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपा आणि शिवसेना युती झाली नाही आणि याचा फटका शिंदे यांच्या शिवसेनेला बसला.  भाजपा 57 जागेवर तर शिवसेना फक्त 13 जागेवर निवडून आली. मात्र आता उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणूकीत शक्य तेथे भाजप सोबत युती करण्यासाठी

  • 19 Jan 2026 09:30 AM (IST)

    असीम सरोदे यांच्या निवासस्थानातील चंदनाच्या झाडाची चोरी

    पोर्श कार मधून येत तीन चोरट्यांनी रात्री केली चंदनाच्या झाडाची चोरी. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे बघायला मिळत आहे.

  • 19 Jan 2026 09:20 AM (IST)

    डोंबिवलीत चोरट्याची दहशत कायम

    डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनी रोड परिसरात एकाच रात्री 4 दुकाने फोडली. स्टार कॉलनी रोड, डोंबिवली पूर्व परिसरात असलेले मेडिकल, जनरल स्टोअर व प्लायवूड दुकानांची शटर उचकटून चोरट्यांनी केली घरफोडी. दोन दुकानांतून 39 हजार रुपयांची रोकड व साहित्य चोरी. चोरीची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, धक्कादायक संवादही रेकॉर्ड

  • 19 Jan 2026 09:12 AM (IST)

    जुन्या वादातून दोन गटात हाणामारी मोठी दगडफेक…

    जळगावच्या नशिराबादेत जुन्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन दगडफेकीची घटना. घटनेत दोन्ही गटांकडून दगड व विटांचा तसेच लाठ्याकाठ्या, पाइप, कुन्हाडीचा वापर झाल्याने तब्बल १६ जण जखमी. जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकीतील कामावरून झालेले वाद उफाळल्याने दोन गटात तुफान हाणामारी दगडफेक झाल्याची माहिती. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टाळला.

     

  • 19 Jan 2026 09:00 AM (IST)

    नाशिक – पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

    पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोसायटीत झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे.  सातपूरच्या कामगारनगर परिसरातील गौरव सोसायटीत घडली घटना आहे.  कुशल जितेंद्र जैन असे सहा वर्षीय मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • 19 Jan 2026 08:59 AM (IST)

    नाशिक महानगरपालिकेत सुधाकर बडगुजर सर्वाधिक मतांनी विजयी

    नाशिक महानगरपालिकेत सुधाकर बडगुजर सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. सुधाकर बडगुजर यांना 14 हजार 864 मतांचा लीड मिळाला आहे.  नाशिक महानगरपालिकेत सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन सुधाकर बडगुजर निवडून आले आहेत.  नाशिक महानगरपालिका प्रभाग 25 मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करुन 19 हजार 634 मते मिळवली.

  • 19 Jan 2026 08:57 AM (IST)

    मालेगावात एमआयएमची मोठी राजकीय खेळी

    मालेगावात एमआयएमची मोठी राजकीय हालचाल पाहायला  मिळत आहे.  इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची एमआयएमची तयारी आहे. जातीयवादी पक्ष व शक्तींना रोखण्यावर ठाम भूमिका मांडणार. सेना-भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे.  शहरहितासाठी इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेससोबत एकत्र येण्याचे संकेत आहेत.

  • 19 Jan 2026 08:51 AM (IST)

    मैफिलमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण

    इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांवर पैशांची उधळण करण्यात आली. शहरात 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात मैफिलचं आयोजन करण्यात आलं होतं. जशन-ए- महाराष्ट्र, जशन-ए-इम्तियाजच मैफिलमध्ये पैशांची उधळण करण्यात आली. नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पैशांची उधळण होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप दिसून आला. यापूर्वी देखील इम्तियाज जलील यांच्यावर पैसे उधळल्याने टीका झाली होती.

  • 19 Jan 2026 08:50 AM (IST)

    जळगावमध्ये शासकीय आयटीआय लगत असलेल्या हातगाड्यांना पहाटे 3 वाजता आग लागल्याची घटना घडली

    जळगावमध्ये शासकीय आयटीआय लगत असलेल्या हातगाड्यांना पहाटे 3 वाजता आग लागल्याची घटना घडली आहे.  या आगीत चार हातगाड्या तसेच टेबल, खुर्च्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून हातगाडी चालकांचे मोठे नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी टवाळाखोरांनी आग लावल्याचा संशय हातगाडी मालकांनी व्यक्त केला आहे.

KDMC निवडणुकीनंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटासोबत सातत्याने संपर्क ठेवण्याचा प्रयत्न होत आगे. ठाकरे गटाचे 9 नगरसेवक अज्ञातस्थळी असल्याची माहिती मिळाली आहे. महापौर बसवण्यासाठी शिंदे गटाला 9 नगरसेवकांची गरज असून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू आहे. तर ठाकरे गटाचे तीन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असून उरलेले नगर सेवक अज्ञातस्थळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दबाव टाळण्यासाठी व एकजूट दाखवण्यासाठी ठाकरे गटाचे नगरसेवक ‘सेफ लोकेशन’वर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुढील काही दिवसांत KDMC मध्ये मोठ्या राजकीय नाट्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मनसेकडून आत्मपरीक्षणाला सुरुवात झाली आहे. पराभवाची कारणे, प्रचारातील उणिवा आणि भविष्यातील रणनितीवर सविस्तर मंथन करण्यात येत आहे. निवडणुकीचा आढावा राज ठाकरे यांच्याकडे पाठवला जाणार आहे. राज ठाकरे लवकरच सर्व उमेदवारांची प्रत्यक्ष भेट घेणार अशी माहिती देखील समोर आली आहे. राजकारणासोबत चोरीची मोठी घटना देखील समोर येत आहे. एडवोकेट असीम सरोदे यांच्या निवासस्थानातील चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे. पोर्श कारमधून येत तीन चोरट्यांनी रात्री चंदनाच्या झाडाची चोरी केली. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल…