
महाविकास आघाडीच्या गटात पक्षात मनसेचा देखील समावेश. धुळे महापालिकेच्या निवडणुकीत उभाठा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटासह सविचारी पक्ष. ऊबाटाचे संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांनी केलं स्पष्ट. खासदार डॉक्टर शोभा बच्छाव व माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात महापालिका निवडणूक लढविली जाणार..
नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प
निफाड जवळ आचोळे नाल्यावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी
ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने संपूर्ण ऊस रस्त्यावर
एक ते दीड तासापासून वाहतूक ठप्प झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जेसीपीच्या साह्याने रस्त्यावरील ऊस हटवण्याचे काम सुरू
ठाणे महापालिका निवडणुकीच्या जागा वाटप संदर्भात महायुतीची दुसरी बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला भाजपकडून आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले तर शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि जेष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे या बैठकीत उपस्थित आहेत.
ठाणे जिल्हा भाजप मध्यवर्ती कार्यालयात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक सुरु आहे. भाजपकडून आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले तर शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि जेष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे बैठकीत उपस्थित आहेत.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे रस्त्यांच्या कामाबाबत तक्रारीच्या चौकशीसाठी आलेल्या समिती अधिकाऱ्यांसमोर समोरच सरपंचाकडून तक्रारदात्यास मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सरपंच मोबीन कुरेशी आणि ग्रामपंचायत सदस्य आणि इतर काही जणांनी अर्जदार शेख बिलालोद्दीन व सय्यद मुजाहेद यांना लाथा-बुक्क्यांनी दगडांनी आणि काठीने मारहाण केल्याची घटना घडली.
नाशिकमधील सदनिका घोटाळ्याच्या प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोटाटे यांनी सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या विरोधात आज हायकोर्टात सुमावणी पार पडली. यात कोर्टाने माणिकराव कोकांटेंना मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता त्यांची अटक टळली आहे.
नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर निफाड जवळ वाहतूक ठप्प झाली आहे. राज्य मार्गावरील निफाड गावाजवळील आचोळे नाल्यावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने ऊस संपूर्ण रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे एक ते दीड तासापासून वाहतूक ठप्प झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील ऊस हटवण्याचे काम सुरू आहे.
ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्यांनंतर आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, एनएसजी कमांडो आणि मुंबई पोलिसांच्या फोर्स वन कमांडोंनी मुंबईतील संवेदनशील भागात आणि ठिकाणी एक मोठी मॉकड्रिल केली. एनएसजी कमांडो आणि मुंबई पोलिसांच्या कमांडोंनी 48 तासांचा मॉकड्रिल केला. विमानतळासह गर्दीच्या ठिकाणीही मॉकड्रिल घेण्यात आले.
कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगिती याचिकेवरील युक्तिवाद संपला असून कोर्ट थोड्याच वेळात निकाल देणार आहे. कोर्टाकडून निकालाचं वाचन सुरू आहे. आजच्या निकालावर कोकाटेंच्या आमदारकीचं भवितव्य ठरणार आहे.
कोडीनयुक्त कफ सिरप प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआर आणि अटक रोखण्याला आव्हान देणाऱ्या रिट याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि अचल सचदेवा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
सरकारी वकिलांनी पुढची तारीख मागितली होती. पण पुढची तारीख देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. कोर्टाने आजच युक्तिवाद पूर्ण करा हे स्पष्ट केलं. आजच निकाल दिला जाईल असं कोर्टाने सरकारी वकिलांना सांगितलं. त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर कोर्ट आजच निकाल देणार आहे. राहुल गांधी आणि ही केस वेगळी आहे असं कोर्टाने सांगितलं आहे.
बहुजन विकास आघाडीसोबत युतीच्या बोलणीसाठी शिवसेना उबाठाचे शिष्टमंडळ हितेंद्र ठाकरांच्या भेटीसाठी दाखल झालं आहे. शिवसेना उबाठा नेते मिलिंद नार्वेकर , विनायक राऊत, विलास पोतनीस, अमोल कीर्तीकर यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. विवा कॉलेज येथील कार्यालयात हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत शिवसेना शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे. बहुजन विकासा आघाडी विरूद्ध भाजपा अशी निवडणूक रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बविआ आणि उबाठा गटात युती होणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत हे सर्वजण लोकलने प्रवास करीत विरारला पोहचले.
कोकाटेंनी मंत्री असूनही गरिबांची घरं लाटल्याचा आरोप हस्तक्षेप करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. दुसरीकडे, कोकाटेंच्या वकिलांनी काही प्रकरणाचा दाखला दिला आहे. यात त्यांना दिलासा मिळाल्याचं सांगितलं. राहुल गांधी यांना दिलासा मिळाला होता, असं दाखला दिला. लिलावतीमधील आयसीयूत दाखल झाले आहेत.
संतोष देशमुख खून प्रकरणाच्या सुनावणीला दुपारच्या सत्रात पुन्हा सुरूवात होणार आहे. आरोपींवर आज चार्ज फ्रेम होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात होणारी आजची ही 22 वी सुनावणी आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना बदलण्यात यावं असा आरोपींचा अर्ज आहे. आता याबाबतचा काय निर्णय येणार याकडे लक्ष लागून आहे.
नाशिक पोलिसांचं पथक गेल्या पाच तासांपासून लीलावती रुग्णालयात आहे. माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात उपचार घेत असल्याने पोलिसांकडून या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. काल डॉक्टरांनी माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी करावी, असं सांगितलं. त्यानंतर आज अँजिओग्राफी करण्यात आली. पोलीस अँजिओग्राफी रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत. तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या विरुद्ध स्थगितीसाठी सुनावणी सुरू आहे.
फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा यांचा रोड शो झाला. गोविंदाच्या प्रचार रॅलीला फलटणकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. फलटण शहरातून अभिनेता गोविंदा यांची शिवसेनेच्या उमेदवारांना घेऊन प्रचार रॅली केली. गोविंदाला पाहण्यासाठी फलटण शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाला जोरदार झटका दिला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष मनिषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे स्वागत केले.
शिक्षेच्या स्थगितीसाठी माणिकराव कोकाटे हायकोर्टात पोहचले आहेत. सुनावणीला सुरुवात झाली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात 2-3 हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. अटक वॉरँट जारी झालंय. मात्र कोकाटे सरेंडर झालेले नाहीत, असं सरकारी वकील म्हणाले. यावर सोमवारी किंवा मंगळवारीपर्यंत कोकाटेंना तात्पुरता दिलासा द्यावा. तसेच कोकाटेंवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याने दिलासा मिळावा, असं कोकाटेंच्या वकीलांनी म्हटलं. तर अंतरिम आदेश अजून दिलेला नाही, असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर परिसरात मध्यरात्री मद्यधुंद तरुण तरुणींचा धिंगाणा पाहायला मिळाला. याचा व्हीडीआे सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही नागरीकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांसमोरही देखील मद्यधुंद तरुणी शिव्या देत होती. भर रस्त्यात तरुण तरुणींच्या धिंगाण्यामुळे पाेलिस ठोस कारवाई का करीत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जळगावात कालिका माता मंदिर परिसरामध्ये शॉर्टसर्किटने चार दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. सखी मॅचिंग सेंटर, विघ्नहर्ता स्पेअर पार्ट व गॅरेज, भगवती ऑटोमोबाईल यासह इतर अशा एकूण चार दुकानांना आग लागली आहे. आगीत चारही दुकानातील कपडे, स्पेअर पार्ट तसेच साहित्य व दुचाकी जळून खाक झाली असून मोठे नुकसान झाले आहे.
चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या परिसरात मध्यरात्री जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याची घटना घडली. रोहिदास कोळी असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलग दोन राउंड फायर झाल्याचा प्राथमिक अंदाज असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची तपासणी सुरू असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या जागावाटपा संदर्भात आज शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे. मंत्री संजय शिरसाठ आणि अतुल सावे या दोन नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडणार आहे. सर्व प्रभागात किमान आम्हाला 50% जागा मिळाल्या तरच आम्ही युती करू असं देखील अतुल सावे यांनी म्हटलंय तर शिवसेनेची या संदर्भात काय भूमिका असणार आहे याकडे लक्ष लागलय.
महायुती बैठकीची तिसरी फेरी आज मुक्तगिरी बंगल्यावर पार पडणार. आज सेना आणि भाजप पक्षाच्या नेत्यांची जागा वाटप संदर्भात रात्री 8 वाजता मुक्तगिरी वर बैठक. महायुतीत 150 जागेवर एकमत झाले असून,उरलेल्या 77 जागा बाबात महत्वाची चर्चा होणार. आज कदाचित सर्व जागेचा तिढा सुटणार.सूत्रांची माहिती.
जळगावात धरणगाव येथे शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनाच्या रांगा. समाधानकारक भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होतेय मोठी गर्दी. कापसाच्या दर्जानुसार 7 हजार 800 ते 8 हजार 100 रुपया पर्यंत शेतकऱ्यांना मिळतोय भाव. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या तब्येती बाबत लीलावती रुग्णालय प्रशासन मेडिकल बुलेटिन काढणार. दुपारी 2 वाजता रुग्णालय प्रशासन कोकटेंच्या तब्येतीची अपडेट देणार. सध्या कोकाटे यांची एंजिओग्राफी सुरू असल्याची माहिती.
ठाण्यात युती नको म्हणून भाजप मंडळ अध्यक्ष यांनी वरिष्ठांकडे मागणी केली होती, तर आता शिवसेनेमध्येच अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. ठाण्यातील मनोरमा नगर प्रभाग क्रमांक तीन ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी हवा अशी शिवसेना आणि पदाधिकाऱ्यांची मागणी. उमेदवार स्थानिक असावा अशी शिवसेना शाखा प्रमुख देवानंद भगत विक्रांत वायचाळ यांची मागणी.
गेल्या तासाभरापासून पथकातील वरिष्ठ अधिकारी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या अँजिओग्राफी संदर्भात नाशिक पोलिसांकडून पाठपुरावा सुरू आहे… एन्जिओग्राफीचा रिपोर्ट नंतर पोलीस पुढील कारवाई करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून पन्नास टक्के जागांची मागणी करण्यात आली. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांनी 50 टक्के जागांची मागणी केली. सोलापुरात युती न झाल्यास स्वबळावर लढण्यास आम्ही सक्षम आहोत… सोलापूर महापालिकेतील युतीच्या चर्चेसाठी 102 पैकी 51 जागांची मागणी आम्ही करतोय… सोलापूर मध्ये आमच्या पक्षाकडे एका प्रभागात 15 ते 20 इच्छुक उमेदवार आहेत… असं वक्तव्य संजय कदम यांनी केलं आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर थोड्याच वेळात एंजिओग्राफी पार पडणार आहे. नुकतच त्यांना एंजिओग्राफीसाठी नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या रुग्णालयात कोकटेंची मुलगी सीमंतिनी आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित आहेत.
स्वतः केलेली कामे दुर्बीण लावून स्वतःच शोधत आहेत, घरोघरी जाऊन पॉकेट बुक वाटत आहेत, करुन दाखवलं चे गाताय जर गाणे, पॉकेट बुक मध्ये कशाला लावली मग द्वेषाची पाने? असा सवाल आशिष शेलार यांना विचारला आहे. ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम, काय करणार हे मुंबईकरांसाठी काम अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
यवतमाळमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आपल्याला फोन करुन धमकावल्याचा गंभीर आरोप ॲड. सीमा तेलंगे यांनी केला आहे. मंत्री उईके यांनी स्वतः माझ्या नातेवाईकांना फोन करून मला धमकावले. तसेच त्यांच्या समर्थकांनी माझ्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता, अशी धक्कादायक माहिती तेलंगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, एका जबाबदार मंत्र्याकडून अशा प्रकारे धमकी दिल्याच्या दाव्यामुळे प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.
यवतमाळ नगर परिषदेसह वणी आणि दिग्रस येथील विविध प्रभागांच्या निवडणुकांसाठी उद्या २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधित निवडणूक क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी आज मतदान पथके साहित्यासह केंद्रांकडे रवाना झाली आहेत. या निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी पक्षात डावलले जात असल्याच्या चर्चांचे पूर्णपणे खंडन करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “शिवसेनेकडून मला डावलले जात आहे असे काहीही नाही, काल माझ्याकडे दुसरी जबाबदारी असल्याने मी उपस्थित नव्हतो. मानपानाच्या राजकारणात मला रस नाही. शेवटी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरूनच काम करावे लागते आणि मी स्वतःला आजही एक कार्यकर्ताच मानतो. नेत्यांच्या प्रभावक्षेत्रात राहण्यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये रमायला आपल्याला अधिक आवडते, असेही त्यांनी रवींद्र धंगेकर यांनी नमूद केले.
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी याचिकाकर्ते अंजली दिघोळे राठोड आणि आशुतोष राठोड स्वतः उच्च न्यायालयात उपस्थित राहणार असून, सत्र न्यायालयाचा शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल कायम राहावा यासाठी ते जोरदार युक्तिवाद करणार आहेत. दरम्यान, नाशिक पोलिसांचे एक पथक काल रात्रीच मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. उच्च न्यायालयातून कोकाटेंना दिलासा मिळतो की त्यांची अडचण वाढते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपाचा सांगली जिल्ह्यावर राग आहे, सांगली जिल्ह्यासाठी भाजपा कोणताही निधी देणार नाही,फसवणूक करणारा पक्ष असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. दहा वर्ष भाजपाचे खासदार होते,त्यावेळी निधी का ? नाही दिला,त्यामुळेच त्या खासदारांनी भाजप सोडली, असा आरोप देखील विशाल पाटलांनी केला आहे.
नाशिक – माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोकाटेंच्या विरोधातील याचिकाकर्ते अंजली दिघोळे राठोड आणि आशुतोष राठोड हे उच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. उच्च न्यायालयात देखील कोकाटेंच्या याचिकेला ते आव्हान देणार आहेत. राठोड दांपत्य उच्च न्यायालयात युक्तिवाद करणार असून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील निकाल कायम रहावा यासाठी बाजू मांडणार आहेत.
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आजच्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
मीरा-भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील एका इमारतीत बिबट्या शिरला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवाने हे घटनास्थळी पोहोचले आहेत. बिबट्याचा वापर मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दादर स्टेशनबाहेर एक व्यक्ती इमारतीवर चढला आहे. संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याच्या रेस्क्यूचे प्रयत्न सुरू आहेत. आज पहाटेपासूनच तो एका इमारतीवर चढून बसल्याचे समजते.
नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत पहिल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने ठेवला भाजपा समोर 60 – 40 चा प्रस्ताव दिला आहे.शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी माहिती दिली. आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत चर्चेतून तोडगा काढू. तर भाजपकडून अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये असताना संख्याबळ जास्त असल्याचा दाखला देत अधिक जागांची मागणी केली आहे. नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील मतदारसंघात दोन्ही आमदार शिवसेनेचे असल्याने अधिकच्या जागा मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यभरात कडाक्याची थंडी सुरू आहे. पुण्यातही तापमानाचा पारा चांगलाच खाली गेलेला पाहायला मिळत आहे. थंडीच्या वातावरणात आहे व्यायाम आरोग्यासाठी अधिक पोषक असल्याने अनेक नागरिक व्यायामासाठी घराबाहेर पडत आहेत.आणखी पुढील काही दिवस तापमानात घट होऊ शकते अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने राखीव जागांवरील उमेदवारांसाठी महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत.निवडणूक लढवण्यासाठी केवळ जात प्रमाणपत्र पुरेसे नसून जातवैधता प्रमाणपत्र किंवा त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे. सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.त्यामुळे सहा महिने मुदत असणार आहे.
आरोपींवर आज दोष निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. दोष निश्चित झाल्यानंतर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवलं जाईल. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर देशमुख कुटुंबीय देखील सुनावणीला उपस्थित राहणार आहेत.आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य तस्करीविरोधात दोन स्वतंत्र कारवाया करत मोठा साठा जप्त केला. उरुळी कांचन आणि भोर तालुक्यात सापळा रचून एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत चारचाकी, ट्रकसह सुमारे ४८ लाख रुपयांहून अधिक किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला.
‘कोणार्क रिवा’ आणि ‘एल्कोन सिल्व्हर लीफ’ सोसायटीच्या पार्किंग परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच वन विभाग व बचाव पथकाने तपासणी सुरू केली. बिबट्या सापडला नसला, तरी पाण्याच्या टाकीजवळ त्याचे पायांचे ठसे आढळले. नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी राज्यातील जिल्हा जात पडताळणीच्या सुट्टीच्या दिवशी ही कामकाज सुरू राहणार आहे. पालिकेच्या राखीव जागा लढवण्यासाठी उमेदवारांना जात प्रमाणपत्र जात पडताळणी आवश्यक आहे. राज्यातील चार जिल्हा समिती अध्यक्ष पद रिक्त असून त्याचा पदभार लगतच्या जिल्ह्यातील समितीकडे दिला आहे. निवडणूक काळात जात पडताळणी प्रमाणपत्र घेण्यात अडचणी येऊ नये यासाठी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू राहणार आहे.
माणिकराव कोकाटे यांची उद्या सकाळी अँजिओग्राफी केली जाणार आहे. लिलावती हॉस्पिटलमध्ये सकाळी अँजिओग्राफी केली जाणार आहे.अँजिओग्राफी चा रिपोर्ट आल्यानंतरच माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासंदर्भात नाशिक पोलीस निर्णय घेणार आहे. तर आज हायकोर्टात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल.
सध्या राज्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. या वर्षाची अखेर आणि वर्षाची सुरुवात निवडणुकीने होणार आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या मध्यंतरात राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. तर त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २० डिसेंबर रोजी राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे. तर २१ डिसेंबर रोजी सर्व नगरपरिषदांचे निकाल लागतील. न्यायालयीन प्रक्रियेत या पालिकांच्या निवडणुका लांबल्या होत्या. उद्या आणि परवा दोन दिवस नगरपालिका मतदान आणि निकालांचा धुरळा उडणार आहे.