गड्या गावापेक्षा आता वावर बरं, कोरोनाच्या भीतीनं लोकांनी गावं सोडली, जीव वाचवण्यासाठी शेताचा आसरा

| Updated on: Apr 22, 2021 | 6:30 PM

शेतकरी कुटुंब आता गाव सोडून शेतात राहणं पसंत करत आहेत. Buldana Ghatnandra dhasalwadi Villagers

गड्या गावापेक्षा आता वावर बरं,  कोरोनाच्या भीतीनं लोकांनी गावं सोडली, जीव वाचवण्यासाठी शेताचा आसरा
घरांना कुलुप लावून ग्रामस्थ शेतात राहायला गेले
Follow us on

बुलडाणा: कोरोनाने घातलेले थैमान आणि शहरातून गावाखेड्यांकडे परतणारी गर्दी पाहून ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतलीय. शेतकरी कुटुंबाने आता गाव सोडून शेतात राहणं पसंत केलंय. राज्यातील ही कोरोना रुग्णांची साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलीय. त्यामुळे शहरात गेलेले नागरिक आता गावाकडे परत येत आहेत. त्यामुळे लहान गावात माणूस एकमेकांच्या संपर्कात येतोच. त्यापेक्षा आपल्या शेतात राहिलेले बरे, असं म्हणत घाटनांद्रा ढासाळवाडी गावातली कुटुंब आता शेतात जाऊन राहत आहेत. (Buldana Ghatnandra dhasalwadi Villagers left village and going to live in farm)

गावापासून दूर राहणंच चांगलं

पूर्वी साथीचे आजार फार येत असे, त्यावेळी सुद्धा ग्रामस्थ शेतातच राहणे पसंद करीत. प्लेगची साथ आली त्यावेळी गावात माणसं पटापटा मरू लागली. तेव्हा गावातले उंदरांनी भरलेले घर सोडून लोकांनी शेतात राहायला सुरवात केली होती. कोरोनामुळे आताही तशीच धास्ती निर्माण झालीय असून आपला जीव वाचवण्यासाठी पुन्हा एकदा ग्रामस्थांनी शेताची वाट धरली आणि आपल बस्तान त्या ठिकाणी मांडलंय. गावापासून दूर राहणे हेच उत्तम असल्याचं मंदा सोर या महिला ग्रामस्थांनी सांगितलं.

उन्हाळी कामांना सुरुवात

कोरोनाच्या भीतीने शेतात बिऱ्हाड हलवलेल्या कुटुंबातील महिलांनी उन्हाळी पदार्थ करण्याचा घाट घातलाय. कुरडया, पापड्या, पापड, लोणची, शेवया, असे वर्षभरासाठी लागणारे पदार्थ घरोघरी बनवायला घेतलेत. शिवाय पुरुष मंडळी आणि लहान मुले या बांधावरून त्या बांधावर चकरा मारणे. या झाडाखालून त्या झाडाखाली पडी मारणे, एखाद्या झाडावरील मधाचं पोळं काढणं, पोहायची हुक्की आली तर विहिरीत मस्त डुबकी मारून तासंतास पोहत बसणं असे उद्योग ही मंडळी करीत आहेत, असं नंदू भुसारी सांगतात.

सोशल डिस्टन्सिंगचं पालन

कोरोनाच्या या परिस्थितीत शेतात जाऊन राहण्याचा हा पर्याय गावकऱ्यांनी केव्हाच शोधलाय. इथे दूरदूरपर्यंत कुणाची संबंध येत नसल्याने सोशल डिस्टन्सिंग खऱ्या अर्थाने पाळलं जातेय शिवाय शेतातील झाडाच्या गार सावलीत मस्तपैकी खाट टाकून सेल्फ क्वारंटाईनची मजाच वेगळी. रोजगाराच्या निमित्ताने शहरात गेलेल्या माणसांनी आता आपल्या गावाची कास धारलीय. आणि गावापेक्षा गड्या आता आपलं शेतच बरं असं म्हणत गावात राहणारे माणसं शेताकडे निघालेत.

संबंधित बातम्या:

चंद्रपुरात बेड मिळाला नाही, झाडाखाली आसरा घेतलेल्या कोरोना रुग्णाचा अखेर मृत्यू!

‘खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात’, राहुल गांधी गरजले

(Buldana Ghatnandra dhasalwadi Villagers left village and going to live in farm)