AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Gaikwad- Shweta Mahale : ‘इतक्या नीच पातळीपर्यंत नाही गेलं पाहिजे’, संजय गायकवाडांचा श्वेता महालेंवर गंभीर आरोप, तुमच्या नवऱ्याने..

Sanjay Gaikwad- Shweta Mahale : सध्या बुलढाण्याचं स्थानिक राजकारण तापलं आहे. संजय गायकवाड विरुद्ध श्वेता महाले असा सामना सुरु आहे. महायुतीच्याच दोन आमदारांमध्ये जुंपल्याच चित्र पहायला मिळतय. आरोप-प्रत्यारोपाची पातळी घसरत चालली आहे.

Sanjay Gaikwad- Shweta Mahale : 'इतक्या नीच पातळीपर्यंत नाही गेलं पाहिजे', संजय गायकवाडांचा श्वेता महालेंवर गंभीर आरोप, तुमच्या नवऱ्याने..
Sanjay Gaikwad- Shweta Mahale
| Updated on: Sep 30, 2026 | 2:04 PM
Share

गणेश सोलंकी, प्रतिनिधी : बुलढाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यातील राजकीय लढाई दिवसेंदिवस अजून तीव्र होत चालली आहे. आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरत चालली आहे. “शिवसैनिक महिलांना माझ्या घरातून मेसेज जात असल्याचा पुरावा जर त्यांनी मला दिला, तर मग माझ्या स्वभावाप्रमाणे मी काय करायचे ते करेल . जर यात काही तथ्य नसेल आणि शिवसैनिक बहिणींना आणि बुलढाण्यातील महिलांना बदनाम करायचा प्रयत्न असेल, तर त्यांनी इतक्या नीच पातळीपर्यंत नाही गेलं पाहिजे” असं आमदार संजय गायकवाड म्हणाले. “सगळे हिंदुत्ववादी चारित्र्यवान लोक असून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न त्यांनी करू नये” असं आमदार गायकवाड म्हणाले.

बुलढाण्याचा बिहार झालाय अशी टीका श्वेता महाले यांनी केली होती. त्याला उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, “ज्यांनी तीन-चार मर्डर केले, बलात्कार केले, लुटमार केली, ज्यांनी लोकांच्या पोरी उचलल्या, ज्यांनी संपत्ती हडप केली, रिव्हॉल्व्हर घेऊन फिरतात, ज्यांना जेल मध्ये घातले, त्यांना तुमच्या नवऱ्याने सोडवायचे काम केले” असा आरोप संजय गायकवाड यांनी केला.

हे हलकट धंदे बंद करा

“काही लोकांची mpda रद्द केली. जे सहा महिने जेलमध्ये होते, त्याच्यासोबत तुम्ही जेवण करता. गुंडांना ताकद देऊन तुम्ही बुलढाणा बसवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही पूर्ण महाराष्ट्र मधील गुंड आणले तरी माझ्या बुलढाण्याचे रक्षण करण्यासाठी मी सक्षम आहे” असं संजय गायकवाड म्हणाले. “देवेन्द्रजी यांना सुद्धा सांगणे आहे की, माझे व्यक्तीगत भांडणं नसून मी माझा पक्ष वाढवण्यासाठी चिखलीत गेलो. लोकांवरील अन्याय दूर करण्यासाठी गेलो. याचा बदला म्हणून ज्यांनी बलात्कार केला, लुटमार केली, संपत्ती लुटली , त्यांच्यासोबत तुमचा खाजगी सचिव बसतो. आणि संजय गायकवाड यांच्या लोकांना मारा, काहीही करा मी बसलेलो आहे, हे हलकट धंदे बंद करा” असं संजय गायकवाड म्हणाले.

अरे इतके माजू नका इतके उतू नका

“माझा बुलढाणा बिहार आहे का? त्याहीपेक्षा तुमच्या चिखलीला तुम्ही गाझियाबाद पेक्षाही भयानक करून ठेवलेले आहे. तुम्ही लोकांची प्रॉपर्टी हडप केली. प्रॉपर्टीवर आरक्षण तुम्ही टाकले, लोकांचे जीवन जगणे मुश्कील केले तुम्ही. कुणी पोस्ट टाकली म्हणून त्याला तडीपार करता. अरे इतके माजू नका इतके उतू नका. ही जनता भाजपा-शिवसेनेची मतदार आहे. काहीतरी ठिकाणावर येऊन काम करा” असं संजय गायकवाड म्हणाले.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...