Buldana vegetable seller : बुलडाण्यातील भाजीविक्रेत्याची ग्राहकांना अनोखी विनंती, गाडीवर लावला फलक, त्यात लिहिलंय, व्याजाने पैसे आणले…

| Updated on: Jul 23, 2022 | 4:42 PM

व्यवसायात नुकसान झाल्यानंतर कळतं. तसं आता राजू यांना कळून चुकलं. उधारीवर व्यवसाय जास्त दिवस करता येत नाही. नुकसान होण्याची शक्यता जास्त.

Buldana vegetable seller : बुलडाण्यातील भाजीविक्रेत्याची ग्राहकांना अनोखी विनंती, गाडीवर लावला फलक, त्यात लिहिलंय, व्याजाने पैसे आणले...
बुलडाण्यातील भाजीविक्रेत्याची ग्राहकांना अनोखी विनंती
Image Credit source: t v 9
Follow us on

बुलडाणा : मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीने पूर्ण जगाला हादरून सोडले. यामध्ये सर्वसामान्याचे देखील आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामध्ये छोट्या- मोठ्या व्यवसायिकावर उपासमारीची वेळ सुद्धा आलीय. छोट्या व्यवसायिकांनी उसणवारी पैसे आणून व्यवसाय (Business) सुरू केला होता. त्याचा असाच एक प्रत्यय मलकापूर शहरात पाहायला मिळाला. एका भाजीविक्रेता (vegetable seller) व्यवसायिकाने आपल्या भाजीच्या गाडीवर एक फलक लावलाय. त्यावर त्यांनी लिहीलंय, उधारी पूर्ण बंद केली आहे. उधारी मागूच नका. व्याजानी पैसे (Money with interest) आणून व्यवसाय सुरू केला आहे. नगदी पैसे द्या. भीक मागायची वेळ आली आहे, असा फलक लावला. गल्लो गल्ली जाऊन आपला व्यवसाय सुरू केलाय. या व्यवसायिकाच्या अनोखी शक्कलची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

20 वर्षांपासून करतात भाजीविक्रीचा व्यवसाय

मलकापूर शहरातील माता महाकाली नगरातील हे व्यवसायिक रहिवासी आहेत. भाजीविक्रेता राजू दाते हे मागील 15 ते 20 वर्षांपासून भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, कोरोना काळात सर्व सामान्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. यामध्ये नुकसान सर्वांचेच झाले होते. भजिविक्रेता राजू दाते याना ही त्याची झळ बसली. तब्बल दोन वर्षांनी कोरोना महामारी आटोक्यात आली. सर्व व्यवसाय सुरू झालेत. बाजापेठेत व्यवसायाची मंदी आहे. दोन काही जण छोटा मोठा व्यवसाय करून पोटाची खळगी भागवत आहे.

फलकात नेमकं काय

राजू दाते यांनीसुद्धा आपला व्यवसाय पुन्हा कसाबसा सुरू केलाय. मात्र हा व्यवसाय सुरू करायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी व्याजाने पैसे आणून भाजीपाला व्यवसाय सुरू केला. तो चालू ठेवण्यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढविली. त्याच्या भाजीच्या गाडीवर त्यांनी फलक लावला. त्यावर उधारी बंद केली आहे. उधारी मागू नका. नगदी पैसे द्या. भीक मागायची वेळ आली आहे, असे आवाहन करून ग्राहकांना सतर्क केले आहे. हे हास्यस्पद असले तरी खरोखर ही वस्तुस्थिती आहे.

हे सुद्धा वाचा

ग्राहकांना स्पष्टच सांगितलं

व्यवसायात नुकसान झाल्यानंतर कळतं. तसं आता राजू यांना कळून चुकलं. उधारीवर व्यवसाय जास्त दिवस करता येत नाही. नुकसान होण्याची शक्यता जास्त. शहाणपणा केलेला बसा. म्हणून राजूनं ग्राहकांना स्पष्टचं सांगितलं. नगदी असतील, तर खरेदी करा. अन्यथा तुमचा मार्ग मोकळा आहे. पण, माझ्याकडून भाजीपाला नेऊन माझं नुकसान करू नका.