Buldana | चिखली शहरातील गवळीपुरा भागातील हातभट्टीवर पोलिसांची धाड, गावठी दारू केली नष्ट..

| Updated on: Aug 01, 2022 | 8:28 AM

चिखली शहरातील गवळीपुरा भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार केली जाते. या हातभट्ट्यांवर कारवाई करत पोलिस अॅक्शन मोडवरती आले आहेत. मात्र, एकदा कारवाई करूनही परत हातभट्टी सुरू केली जातंय. गवळीपुरा येथे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धाड टाकत सर्व हातभट्टया नष्ट केल्या होत्या.

Buldana | चिखली शहरातील गवळीपुरा भागातील हातभट्टीवर पोलिसांची धाड, गावठी दारू केली नष्ट..
Follow us on

बुलढाणा : मागील काही दिवसांपूर्वी चिखली शहरातील गवळीपुरा (Gawlipura) भागात गावठी दारुच्या हातभट्यांवर पोलीसांनी धाड टाकून लाखो रुपयांची दारु नष्टं केली होती. त्यानंतर काही दिवस या हातभट्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा या हातभट्या सुरू झाल्याची कुणकुण पोलिसांना (Police) लागली. मग पोलिसांनी धाड टाकत परत एकदा गावठी दारू नष्ट केलीयं. मात्र, एकदा धाड टाकत पोलिसांनी गावठी दारू नष्ट करून तेथील साहित्य देखील जप्त केल्यानंतरही या हातभट्या सुरूच कशा करण्यात आल्या, असा प्रश्न (Question) उपस्थित केला जातोयं.

गवळीपुरा भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या हातभट्ट्या

चिखली शहरातील गवळीपुरा भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार केली जाते. या हातभट्ट्यांवर कारवाई करत पोलिस अॅक्शन मोडवरती आले आहेत. मात्र, एकदा कारवाई करूनही परत हातभट्टी सुरू केली जातंय. गवळीपुरा येथे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धाड टाकत सर्व हातभट्टया नष्ट केल्या होत्या. पोलिसांच्या या कारवाईनंतर हातभट्टी चालकांनी चांगलाच धसका घेतला होता.

हे सुद्धा वाचा

चिखली शहर पोलिस अॅक्शन मोडवरती

हातभट्टीवर पुन्हा दारू तयार केली जात असल्याची माहिती ठाणेदार अशोक लांडे यांना मिळाल्यावर त्यांनी पुन्हा या हातभटयांवर धाड टाकून हातभटया नष्ट केल्या. यावेळी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून प्लास्टिकच्या ड्रममध्ये सोडलेला गुळ मिश्रीत रसायन तसेच गावठी दारूसाठी वापरण्यात येणारे रसायन सुद्धा जप्त केले. यावेळी दारूविक्री करणारे त्याठिकाणी भट्टी लावुन दारु तयार करून चोरटी विक्री करताना सुद्धा आढळुन आले. पोलीसांनी अड्ड्यावर जाऊन ही अवैध दारु मोठ्या प्रमाणात नष्ट केली.