AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, लैंगिक अत्याचार मारणाच्या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या विभागीय कार्यालयात सहा तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर राऊत यांना अटक करण्यात आली आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राऊत तपासात सहकार्य करत नसल्यामुळे अटक केली आहे.

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, लैंगिक अत्याचार मारणाच्या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल
Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, लैंगिक अत्याचार मारणाच्या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 01, 2022 | 8:13 AM
Share

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ अधिक होत आहे. काल त्यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्याचबरोबर स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात जबाब नोंदवला आहे. स्वप्ना पाटकर यांना लैंगिक अत्याचार आणि जीवे ठार मारण्याची धमक आली होती. त्यामुळे संजय राऊत यांच्या विरोधात वाकोला पोलिस स्टेशनमध्ये (Vakola Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल राऊतांच्या घरी ईडीने सकाळपासून छापेमारी केली. त्या छापेमारी त्यांना काही पैसे आढळून आल्याने राऊत यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले होते. रात्री उशिरा त्यांना अटक केली आहे.

स्वप्ना पाटकर यांनी पत्रात काय लिहिलं आहे

स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी राऊत यांच्या विरोधात वाकोला पोलिस ठाण्यात कलम 504, 506 आणि 509 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाटकर या पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार आहेत. रविवारी रात्री एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटकर यांनी दिलेल्या पत्रात बलात्कार आणि खुनाची धमकी दिल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला होता. 15 जुलै रोजी हे पत्र वाकोला पोलिस स्टेशनमध्ये दिलं होतं. त्यानंतर त्यांना सुरक्षा देण्यात आल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी सांगितली आहे.

राऊत तपासात सहकार्य करत नाहीत

दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या विभागीय कार्यालयात सहा तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर राऊत यांना अटक करण्यात आली आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राऊत तपासात सहकार्य करत नसल्यामुळे अटक केली आहे.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन