२५ जणांचा बळी घेणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सबद्दल मोठा खुलासा; ट्रॅव्हल्स चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर

| Updated on: Jul 07, 2023 | 3:28 PM

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन 25 जणाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अपघातग्रस्त गाडी शेख दानीश हा चालवत होता. त्यावेळी तो दारू पिऊन असल्याचे या अहवालावरून समोर आले.

२५ जणांचा बळी घेणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सबद्दल मोठा खुलासा; ट्रॅव्हल्स चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर
Follow us on

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातमधील विदर्भ ट्रॅव्हल्सचा चालकाबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. चालक शेख दानीश हा दारूच्या नशेत होता. त्याच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर फॉरेन्सिक अहवालात हे समोर आले आहे. त्याच्या शरीरात 0.30 एवढे अल्कोहोल आढळले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी ही माहिती दिली.

२५ जणांचा झाला होता होरपळून मृत्यू

सध्या चालक शेख दानीश हा न्यायालयीन कोठडीत असल्याचेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले. एक जुलै रोजी समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन 25 जणाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अपघातग्रस्त गाडी शेख दानीश हा चालवत होता. हे या अहवालावरून समोर आले. असं पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले.

रक्ताच्या नमुन्याचा अहवाल आला

समृद्धी महामार्गावर झालेल्या खाजगी बस अपघातामध्ये 25 जणांचा होळपळून मृत्यू झाला होता. त्यावेळी बस चालकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अपघातानंतर बस चालकाच्या रक्ताचे नमुने अमरावतीच्या फॉरेन्सीक लॅब अधिकाऱ्यांनी घेतले होते. या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल आला आहे. या रक्ताच्या नमुन्यांमध्ये 30 टक्के अल्कोहोल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रक्तात अल्कोहोलचं मान्यताप्राप्त प्रमाण १०० मिलीलीटर रक्तात ३० मिलीग्राम अल्कोहोल एवढ आहे. मात्र, दानीश शेखच्या रक्तात अपघाताच्या दिवशी ३० टक्के जास्त अल्कोहोल आढळले. त्यामुळे १ जुलै रोजी घडलेला अपघात चालकाच्या मद्यपानामुळे घडल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

चालकाला होऊ शकते शिक्षा

अपघातावेळी चालकाचा डोळा लागला. त्यामुळे बस मध्यभागाच्या भींतीवर आदळली. बसचालक दानीशवर हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी चालवताना चालकाने मद्यपान केल्याचे पुढं आले. त्यामुळे चालक दोषी सिद्ध झाल्यास त्याला १० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ जणांचा बळी गेला. त्याला जबाबदार कोण यावरून मतमतांतर आहेत. आता चालकाच्या रक्त्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळल्याने चालकाविरोधात मृतकांच्या नातेवाईकांचा रोष आहे.