Sanjay Raut | ‘संजय राऊत पागलची अवलाद’, शिंदे गटाच्या नेत्याचा तोल ढासळला

| Updated on: Sep 29, 2023 | 1:46 PM

Sanjay Raut | अजित पवारांचा निर्णय पवार साहेबांना किती पटलाय, हे महारष्ट्र पाहत आहे. रमेश कदम पण राष्ट्रवादीचे आणि भुजबळ साहेब पण त्याच पक्षात होते. त्यांच्यामध्ये कोण ब्लेकमेलिंग करत होते, हे आपण नाही सांगू शकत.

Sanjay Raut | संजय राऊत पागलची अवलाद, शिंदे गटाच्या नेत्याचा तोल ढासळला
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बुलढाणा (गणेश सोलंकी) : “पवार साहेबांनी जेवढे उन्हाळे, पावसाळे पाहिलेत, ते सेक्युलर माईंडचे आहेत. ते कधीच भाजपासोबत जातील असे मला वाटत नाही. एकनाथ शिंदे सोबत 50 आमदार होते म्हणून सरकार मजबूत झाले. दादा आले म्हणून अजून मजबूत झाले. याचा अर्थ असा नाही की, मुख्यमंत्री बदलणार किंवा पवार साहेब इकडे येतील” असं संजय गायकवाड म्हणाले. ते शिंदे गटातील आमदार आहेत. “अजित पवारांचा निर्णय पवार साहेबांना किती पटलाय, हे महारष्ट्र पाहत आहे. पवारसाहेब असा काही निर्णय घेतील, असं त्यांच्या स्वभावावरून वाटत नाही. संजय राऊत पागलची अवलाद आहे” अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.

मुलूंडमध्ये एका मराठी मुलीला घर नाकारण्यात आलं. त्या मुद्यावर ते म्हणाले की, “ज्या महाराष्ट्राने गुजरातसह इतर प्रांतातल्या लोकांना आपलेसे केले, त्या गुजरातच्या लोकांनी आपलेसे केले पाहिजे. त्यांनी तशी भूमिका घ्यायला नको होती. असे असेल तर मुख्यमंत्री तपास करून जे काही कारवाई करायची तर करतील. कुठलंही निर्णय देण्याबाबत कोणतेही कोर्ट मर्यादा घालू शकत नाही” असं संजय गायकवाड म्हणाले. “घाना देश माहिती असो की नसो, त्यांना बोलावले असेल तर तो त्यांचा व्यक्तीगत विषय आहे. संजय राऊत कुठे तोंड खुपसतो, कुठे जातो, हे काही कुणी विचारते का त्याला?” अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.

रमेश कदम, छगन भुजबळ दोघे राष्ट्रवादीचे

“रमेश कदम पण राष्ट्रवादीचे आणि भुजबळ साहेब पण त्याच पक्षात होते. त्यांच्यामध्ये कोण ब्लॅकमेलिंग करत होते, हे आपण नाही सांगू शकत. ते काही बोलत असतील तर त्याला काही आधार असेल” असं संजय गायकडवाड म्हणाले. “कोणालाही मुख्यमंत्री व्हायचे असेल तर मॅजिक फिगर गाठावी लागेल. ज्याच्याकडे पन्नास टक्केपेक्षा जास्त आमदार असेल तोच मुख्यमंत्री होत असतो. राणा जर काही बोलले, तर तसे होणार नाही, पण एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करणार. एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करतील. 2024 च्या निवडणुका सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप, सेना, आणि अजित दादा गट लढणार” असं संजय गायकवाड यांनी सांगितलं.