उद्धव ठाकरेंना जबर धक्का, राणेंनी केला मोठा गेम, घडामोंडींना वेग
महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला, पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, दरम्यान त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, आधी नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या, महापालिकांच्या निवडणुका होताच आता निवडणूक आयोगाकडून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान आहे, तर सात फेब्रुवारी रोजी या निवडणुकींसाठी मतमोजणी होणार आहे. दरम्यान त्यापूर्वीच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना कणकवलीमध्ये मोठा धक्का दिला आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या, या महापालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं पहायला मिळालं. अनेक ठिकाणी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे त्याचा मोठा फायदा हा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला झाला होता, यावर शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेप देखील घेण्यात आला होता. दरम्यान पुन्हा एकदा आता असाच प्रकार हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये देखील पहायला मिळत आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.
पंचायत समिती निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला कणकवली तालुक्यात दुसरा मोठा धक्का बसला आहे. वरवडे पंचायत समितीमधून भाजपाचे सोनू सावंत हे बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमदेवार सुधीर सावंत आणि मनसेचे उमेदवार शांताराम साद्ये यांनी निवडणुकीतून माघार घेतली, या माघारीचा थेट फयदा हा भाजपला झाला असून, भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा तिसरा उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम असल्याचं पहायला मिळत आहे. भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं हा शिवसेा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. या मतदारसंघातून मनसेच्या उमेदवारानं देखील माघार घेतली आहे.
