
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेल प्रकरणामुळे चर्चेत आहेत. आता त्यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांच्या एकूण संपत्तीची चर्चा रंगली आहे.

विरोधकांनी संजय शिरसाट यांच्यावर व्हिट्स हॉटेलच्या खरेदीवरुन अनेक आरोप केले. बाजारभावानूसार ११० कोटी रुपयांचे हॉटेल शिरसाट यांच्या मुलाने ६७ कोटी रुपयांना घेतले होते. हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात सभागृहात उचलून धरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे जाहीर केले होते. तसेच त्यांना आयकर विभागाकडून देखील नोटीस बजावण्यात आली.

संजय शिरसाट यांनी 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी संपत्तीचे विवरणपत्र सादर केले होते. त्यामध्ये गेल्या पाच वर्षात एकूण 13 टक्क्यांनी त्यांची संपत्ती वाढल्याचे दिसत होते.

संजय शिरसाट यांची जंगम संपत्ती 2019 मध्ये 1.21 कोटी होती. ती आता 2024 मध्ये 13.37 कोटी झाली होती. त्यांची स्थावर संपत्ती 2019 मध्ये 1.24 कोटी होती. तर 2024 मध्ये ती 19.65 कोटी झाली.
