अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, आई शर्मिला ठाकरे यांची पहिली प्रतिक्रीया…

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांच्यावर नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात विविध स्तरातून प्रतिक्रीया उमटत आहे. त्यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, आई शर्मिला ठाकरे यांची पहिली प्रतिक्रीया...
sharmila thackeray and amit thackeray
Updated on: Nov 17, 2025 | 9:46 PM

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर नेरुळ येथील शिवरायांचा पुतळा विना परवाना उद्घाटन केल्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात त्यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा पुतळा उद्घाटनावाचून होता असा आरोप मनसे करीत रविवारी अमित ठाकरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यावरुन नवीमुंबईत अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी रविवारी नेरुळ येथील राजीव गांधी पुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. त्यावरुन त्यांनी विनापरवाना पुतळ्याचे उद्घाटन केले म्हणून त्यांच्यावर नवीमुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे यांनी पत्रकारांना प्रतिक्रीया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी मला याचा अभिमान वाटतोय अशी प्रतिक्रीया दिली आहे.

शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या की मला अभिमान आहे, खूप अभिमान आहे. मी पण वाट बघते माझ्यावर कधी केस होते. यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज पाहिजेत. आता परवाच साहेब म्हणालेत की आता किल्ल्यावर हे सरकार नमो सेंटर उभारणार आहेत. महाराजापेक्षा यांना किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही. त्या पुढे म्हणाल्या की यांना निवडणुकीसाठी महाराज दिसतात पंतप्रधान येऊन गेले, त्यांना वेळ मिळाला नसेल. मी पण पाहिले किती धुळीने भरलेला पुतळा होता.

पोलीस तिकडे का नाही पाहात ?

राज्यातील किल्ल्याचे संवर्धन झाले पाहिजे. परंतू वांद्रे येथील किल्ल्यावर दारू पार्टी झाली आहे. या पार्ट्यांना कोणी परवानगी दिली. किल्ल्यांवर झोपडी बांधायला कोण परवानगी देते? इथे काय केले तर लगेच पोलीस येतात मग तिकडे का नाही पोलीस पाहात असाही सवाल शर्मिला ठाकरे यांनी केला आहे. निवडणूकीसाठी जर दोन बंधू एकत्र येऊन लढणार असेल तर चांगले आहे असेही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले आहे.