Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेला मोठा धक्का! पोलिसात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

सीजेपीचे अध्यक्ष संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर लातूर येथे गुन्हा दाखल झाला आहे. काय नेमके घडले वाचा...

Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेला मोठा धक्का! पोलिसात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke
| Updated on: Aug 22, 2026 | 9:43 PM

लातूर जिल्ह्यातल्या औसा शाळेत जाऊन चित्रीकरण केल्याच्या प्रकरणात सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागातील शाळा चांगल्या व्हाव्यात यासाठी आम्ही असे आणखी गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, असं CJP चे पदाधिकारी अजिंक्य शिंदे यांनी म्हटले आहे. अजिंक्य शिंदे यांच्या सल्ल्याप्रमाणेच अभिजित दिपके यांनी लातूर जिल्ह्यातल्या शाळांचा दौरा केला होता.

‘स्कूल ठीक करो’ अभियान:

सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी लातूर जिल्ह्यातील औसा येथील सरकारी शाळेला २० ऑगस्ट २०२६ रोजी भेट दिली होती. यावेळी त्यांनी शाळेत सुरू असलेल्या गैरप्रकारांची पोलखोल करण्यासाठी सोशल ऑडिट केले. या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पट संख्या जास्त दाखवण्यासाठी खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना आणून वर्गात बसवण्यात आल्याचा आरोप यावेळी अभिजीत दीपके यांनी केला होता. याचे चित्रीकरण करुन त्यांनी सोशल मीडियावर दाखवले होते. यानंतर या शाळेतील एका महिला शिक्षिकेने  औसा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात विनापरवानगी शाळेत प्रवेश करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, शिक्षकांना दमदाटी करणे आणि बेकायदेशीरपणे व्हिडिओ चित्रीकरण करून शाळेची बदनामी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us