AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारची सर्वात मोठी घोषणा! कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंताच मिटली; सगळाच कांदा आता थेट…

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा अगदी कवडीमोल भावाने विकला जात आहे. असे असतानाच आता सरकारने मोठी घोषणा केली आहे.

सरकारची सर्वात मोठी घोषणा! कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंताच मिटली; सगळाच कांदा आता थेट...
onion priceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2026 | 3:59 PM
Share

पश्चिम आशियातील युद्धामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी तर होरपळून निघाला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांदापिकाला कवडीमोल भाव आहे. कित्येक क्विंटल कांदा विकूनही शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही शिल्ल्क राहात नाहीये. उत्पादन खर्चह भरून निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. हीच अडचण लक्षत घेऊन आता सरकारने मोठ घोषणा केली आहे. शेतकऱ्यांकडे असलेला सर्व कांदा सरकार विकत घेणार आहे. तशी घोषणाच केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.

सरकार 1235 रुपये प्रति क्विंटलने कांदा खरेदी करणार

शिवराजसिंह चौहान हे साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कांदा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून 12.35 रुपये प्रति किलोच्या दराने (म्हणजेच 1235 रुपये प्रति क्विंटर) कांदा खरेदी करणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे. या घोषणेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. पश्चिम आशियातील संकटामुळे कांद्याच्या निर्यातीत बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळेच कांद्याचा भाव पडला आहे, असेही चौहान यांनी यावेळी सांगितले. चौहान यांच्या या घोषणेनंतर नाफेडला कांदा खरेदीचा आदेश देण्यात आला आहे.

कमीत कमी 3000 रुपये प्रति क्विंटल भाव हवा

सरकारने आता शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याची घोषणा केलेली असली तरीही शेतकऱ्यांनी मात्र असमाधान व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाने 1235 रुपयांचा हा दर पुरेसा नाही. या पैशांतून शेतकऱ्यांचा अत्पादन खर्चदेखील निघणार नाही. कांद्याला कामती कमी 3,000 रुपये प्रति क्विंटल भाव पाहिजे. तरच शेतकऱ्यांना फायदा होईल. ज्या शेकऱ्यांनी कवडीमोल भावाने कांदा विकला त्यांना सरकारने नुकसान भरपाईदेखील द्यायला हवी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाने केली आहे. तसेच आमची मागणी सरकारने मान्य न केल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकार नेमकं काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.