Mumbai Bridge: गणेशोत्सवाआधी मोठा निर्णय, मुंबईतले चार पादचारी पूल तातडीने बंद, प्रवास करणं महागात पडेल

Mumbai Bridge: उद्यापासून पुढील दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जाईल, संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या दिमाखात साजरा केला जाईलच. पण महाराष्ट्रात विशेषत: मुंबईतील गणेशोत्सवाची चर्चा सर्वत्र असते. या उत्सवा दरम्यान नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.

| Updated on: Sep 13, 2026 | 12:53 PM
1 / 5
गणेशोत्सव सुरु होताच माटुंगा आणि मशिद बंदर स्थानकातील प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. या स्थानकातील चार पादचारी पूल बंद करण्याचा निर्णय आता मध्य रेल्वेने घेतला आहे.

गणेशोत्सव सुरु होताच माटुंगा आणि मशिद बंदर स्थानकातील प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. या स्थानकातील चार पादचारी पूल बंद करण्याचा निर्णय आता मध्य रेल्वेने घेतला आहे.

2 / 5

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई’ यांनी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार हे पूल धोकादायक ठरले आहेत. यामुळे मुंबई महापालिकेच्या सूचनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

3 / 5

यांच्यातर्फे २७ ऑगस्टला मशीद बंदर येथील भंडारी पादचारी पूल , मशीद बंदर स्थानक पादचारी पूल, भाऊ दाजी रोडवरील माटुंगा लेव्हल क्रॉसिंग पादचारी पूल आणि गुरू नानक हायस्कूलजवळील माटुंगा-धारावी पादचारी पूल या पुलांची मुंबई महापालिका आणि रेल्वे अधिकारी यांच्यातर्फे पाहणी केली गेली.

4 / 5

ऑडिटनुसार, हे चारही पूल असुरक्षितअसल्याचे दिसून आले. या अहवालात हे पूल रहदारीसाठी त्वरित बंद करावेत आणि त्याची नव्याने उभारणी करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

5 / 5

गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या आणि पादचाऱ्यांच्या संख्येत होणारी मोठी वाढ लक्षात घेता, हे पूल तातडीने बंद करणे महत्त्वाचे आहे. उत्सवात रेल्वे स्थानके आणि आसपासच्या परिसरात मोठी गर्दी अपेक्षित असल्याने, कोणतीही अनुचित घटना घडू नयेन यासाठी मध्य रेल्वेने प्रवासी आणि नागरिकांना केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us