Periods: मासिक पाळी सुरु असल्याने मुलीला वृक्षारोपण करु दिले नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले चौकशीचे आदेश

| Updated on: Jul 26, 2022 | 4:55 PM

मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मनाई करण्याच्या नाशिक मधील घटनेच्या चौकशी करण्याचे आदेश महिला आयोगाकडून देण्यात आले आहे. ही बाब अतिशय निंदनीय असून महराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल घतेली आहे. मनाई करणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोग कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Periods: मासिक पाळी सुरु असल्याने मुलीला वृक्षारोपण करु दिले नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले चौकशीचे आदेश
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मासिक पाळी (Menstrual Cycle) सुरु असल्याने एका मुलीला वृक्षारोपण करु दिले नाही. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेत (Devagaon Ashram School) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. वृक्षारोपण न करु दिल्याचे या मुलींनी आपल्या पालकांना सांगीतले या नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. हा प्रकार पाहून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Chairperson of Women’s Commission Rupali Chakankar ) देखील चांगल्याच संतापल्या आहेत. या घटनेटी चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मनाई करण्याच्या नाशिक मधील घटनेच्या चौकशी करण्याचे आदेश महिला आयोगाकडून देण्यात आले आहे. ही बाब अतिशय निंदनीय असून महराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल घतेली आहे. मनाई करणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोग कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

इगतपुरी येथील त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेत घडला हा प्रकार

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेत (Devagaon Ashram School) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पावसाळ्यात येथील कन्या आश्रम शाळेतील विद्यार्थिनींकडून परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र एका विद्यार्थिनीला शिक्षकांनी झाड लावण्यापासून रोखले. तुझी पाळी सुरु आहे. तू झाड लावलंस तर ते झाड मरेल, असा अजब तर्क या शिक्षकाने लावला. तसे कारण सांगून विद्यार्थिनीला बाजूला ठेवले. घडल्या प्रकाराचा संताप आल्याने सदर विद्यार्थिनीने घरी पालकांना हा किस्सा सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने पालकांच्या सांगण्यावरून आदिवासी विकास विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अप्पर आयुक्तांनी दिले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. येथील मुलीने केलेल्या तक्रारीनुसार, साधारण दहा ते पंधरा दिवसांपूर्वी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीला असं बोलल्याचा प्रसंग घडला. शाळेतील विद्यार्थिनींमध्ये शिक्षकाने सरळ सूचना केली. ज्यांची मासिक पाळी सुरु असेल त्या विद्यार्थिनीने झाड लावू नये. नाही तर हे झाड जळून जाईल….या वक्तव्यामुळे विद्यार्थिनीला प्रचंड राग आला. सर तुम्ही असे कसे म्हणू शकता, असा प्रश्न विचारल्यावर, ‘तू कोण विचारणारी, उद्धट बोलते. लई शहाणी झालीस विचारणारी… असं वक्तव्य करून विद्यार्थिनीच्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.
पाळीचा आणि वृक्षारोपणाचा काहीही संबंध नसताना केवळ अंधश्रद्धेपोटी शिक्षकाने अशा प्रकारे बाजूला ठेवल्याने विद्यार्थिनीने सदर प्रकाराची तक्रार घरच्यांकडे केली.